मुक्तपीठ टीम
भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला आहे. देशात 5G सेवा ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. सर्व दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या पायाभूत सुविधा जवळजवळ तयार केल्या आहेत. पण 5G लाँच होण्यापूर्वी एक उत्सुकता प्रत्येकालाच आहे. आपल्याला 5Gच्या भन्नाट वेगाचा फायदा कधी मिळणार? जियो आणि एअरटेल त्यांच्या 5G सेवा भारतात कधी लाँच करणार आहेत? कारण सध्यातरी तीन खासगी दूरसंचार कंपन्यांपैकी याच दोन कंपन्या 5G लाँच रेसमध्ये पुढे दिसत आहेत.
भारतीय बाजारात रिलायन्स जियो, व्होडाफोन आयडिया (Vi), भारती एअरटेल आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) अशा चार टेलिकॉम कंपन्या आहेत.
5G रोलआउटच्या बाबतीत जियो आणि एअरटेल चांगल्या टप्प्यावर आहेत. पण, भारतातील तिसरी सर्वात मोठी खासगी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया आपली 5G सेवा देशात कधी सुरू करेल, याविषयी अद्याप काही उघड झालेलं नाही. भारतात 5G लाँच होण्याची काय स्थिती आहे, यावर एक नजर टाकूया.
- एअरटेल आणि जियो या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी 5G शी संबंधित अनेक घोषणा केल्या आहेत.
- एअरटेल आणि जियोने म्हटले आहे की २०२४ पर्यंत ते त्यांच्या 5G नेटवर्कसह देशातील बहुतांश भागात पोहोचतील.
- दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी कोणत्या प्रकारचे 5G लाँच करतील आणि कधी लाँच करतील हे सांगितले.
- एअरटेल आणि जियोने ऑक्टोबर २०२२ मध्ये 5G सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले होते.
या शहरात जियोची प्रथम 5G सेवा होणार सु9रु…
- दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे प्रथम जियोची 5G सेवा सुरु होणार आहे.
- एअरटेलने अद्याप कोणत्याही शहरांची नाव दिलेले नाही जेथे ते 5G सेवा सुरू करणार आहे.
- एअरटेलही सर्व मेट्रो शहरांना लक्ष्य करेल.
व्होडाफोन आयडियाची अद्याप 5G ची घोषणा नाही!
- व्होडाफोन आयडिया ने अद्याप 5G सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
- या संपूर्ण प्रकरणी व्होडाफोन आयडीया यांनी मौन बाळगले आहे.
- व्होडाफोन आयडियाचे नवीन सीईओ, अक्षय मुंद्र यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की कंपनी सध्या 5G उपकरणे खरेदी करण्यासाठी विक्रेत्यांसह निधीची व्यवस्था करण्यासाठी अनेक बँकांशी चर्चा करत आहे.
- या सर्व गोष्टींची क्रमवारी लावल्यानंतर कंपनी भारतात आपली 5G सेवा सुरू करणार आहे.
- व्होडाफोन आयडिया देशात त्यांची 5G सेवा कधी सुरू करेल हे सध्या सांगता येणार नाही.
- व्होडाफोन आयडियाने काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) कर्जदारांचा विश्वास मिळवण्यासाठी २,७०० कोटी रुपये प्रीपेड केले होते.