मुक्तपीठ टीम
राज्यभरातून नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. त्यात पालघर जिल्ह्यातील निकाल हा लक्ष वेधून घेणारा आहे. तेथे सर्व प्रस्थापित पक्षांना मागे सारत निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील जिजाऊ संघटनेने मुसंडी मारली आहे. नगरपंचायतीच्या एकूण ५१ जागांपैकी सर्वाधिक २० जागी जिजाऊचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अन्य पक्ष हे एकआकडीच ठरलेत. त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या सर्वांचं लक्ष वेधलेल्या नगरपंचायतीत जिजाऊने १७ पैकी १६ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. मोखाडा, तलासरी या दोन नगरपंचायतींमध्येही जिजाऊने आपलं खातं उघडलं आहे.
पालघर जिल्ह्यात ५१ जागांवरील निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ‘जिजाऊ’!
- जिजाऊ – २०
- शिवसेना – १२
- भाजप – ०८
- माकपा – ०६
- राष्ट्रवादी – ०४
- कॉंग्रेस – ०१
एकूण जागा – ५१
विक्रमगडमध्ये ‘जिजाऊ’ची एकहाती सत्ता!
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा आमदार आहेत. तरीही स्थानिक मतदारांनी तिथं १७ पैकी १६ जागांवर ‘जिजाऊ’च्या उमेदवारांना विजयी केले.
विक्रमगडमधील मतदारसंघनिहाय निकाल:
- प्रभाग क्र. २ – मनोज विलास वाघ
- प्रभाग क्र. ३ – चंद्रशील अमोल भडांगे
- प्रभाग क्र. ४ – निलेश रमेश पडवळे
- प्रभाग क्र. ५ – जोत्स्ना योगेश माडी
- प्रभाग क्र. ६ – जयश्री पांडुरंग महाला
- प्रभाग क्र. ७- पुष्पा मोहन डंबाळी
- प्रभाग क्र. ८ – भारती रमेश बांडे
- प्रभाग क्र. ९ – माधुरी विष्णु सांबर
- प्रभाग क्र. १० – वैशाली गणेश तामोरे
- प्रभाग क्र. ११ – अमोल दिलीप भडांगे
- प्रभाग क्र. १२ – विजय विठ्ठल मेघवाली
- प्रभाग क्र. १३ – अर्चना श्याम लोहार
- प्रभाग क्र. १४ – किर्ती सुरेश कुनोजा
- प्रभाग क्र. १५ – अमित जान्या भावर
- प्रभाग क्र. १६ – महेंद्र तुकाराम पाटील
- प्रभाग क्र. १७ निमा अंकुश महाला
उगाच राजकारण करत न बसता, सामान्यांच्या शिक्षण, आरोग्य प्रश्नांना सोडवण्यावर भर दिल्याचा फायदा – निलेश सांबरे
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली १३ वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण या माध्यमातून जिजाऊचे कार्यकर्ते रात्रंदिवस काम सुरु असते. आम्ही फक्त निवडणुकींच्यावेळी लोकांजवळ जात नाही. त्यामुळे पालघरमध्ये मतदारांनी जिजाऊला सर्वात मोठा पक्ष बनवलं आहे. पण त्यामुळे आता जबाबदारी जास्त वाढली आहे. त्यातही जिथं सत्ता मिळाली त्या विक्रमगडमध्ये आम्हा खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. पण आम्ही विक्रमगडचा आणखी जास्त विकास आणि खऱ्या अर्थाने ते एक चांगले सर्व सुविधांनी सुसज्ज शहर व्हावे, त्याची आर्थिक भरभराट व्हावी, असे प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दिली.
तसेच तलासरी, मोखाडा येथे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून विकासकार्य कसे असते, विकासाचे जिजाऊ मॉडेल कसे आहे, तेही लोकांसमोर मांडू असंही त्यांनी सांगितले.