मुक्तपीठ टीम
२१ जुलैच्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या बत्तीसशिराळा तालुक्यातील मौजे देववाडीत ८ फुटापेक्षा जास्त पाणी भरले होते. त्यामुळे संपूर्ण देववाडी तब्बल पाच दिवस पाण्याखाली होती. देववाडी गावातील हे ३९१ उद्ध्वस्त संसार सावरण्यासाठी पालघरमधील जिजाऊ संस्थेने धाव घेतली आहे. देववाडीतील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देत आधार दिला आहे.
निसर्गाच्या प्रकोपाने देववाडीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पाच दिवस गाव पाण्याखाली राहिल्याने गावकऱ्यांचे अतोनात हाल झाले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना गावाची स्थिती समजताच त्यांनी आपली टीम पाठवली. तीन रुग्णवाहिकांसह जिजाऊची टीम महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य किट, ब्लॅंकेट, बिस्लेरी पाणी व औषधांसह गावात पोहोचली. गरजूंना ही मदत देण्यात आली.
जिजाऊच्या टीममध्ये जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण, मितेश घाडी, सज्जन जमदरे, गोपाळ पाटोळे, रोहित चक्रवर्ती, मधुकर पवार, परेश शिंदे, अली अन्सारी, रुपेश एगडे, अदणाद शेख, सुदर्शन पाटील, आत्मामालिक संस्थेचे पंकज पाटील आदी सहभागी आहेत. जिजाऊ संस्थेच्या या मदतकार्यासाठी आत्मामालिक संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. मदतीबद्दल देववाडी गावकऱ्यांनी जिजाऊ संस्थेचे व निलेश सांबरे यांचे विशेष आभार मानले आहेत.