Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदिवासी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित, ‘जिजाऊ’ आक्रमक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jijau Strike for tribal students

मुक्तपीठ टीम

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणाची सरकारची चांगली योजना आहे. पण दहावी झाल्यानंतर जव्हार प्रकल्पांतर्गत २८७ विद्यार्थ्यांना ११वीत नामांकित शाळांमध्ये अद्याप प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधःकारमय झाले आहे. या विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटना ठिय्या आंदोलन करत आहे.

जिजाऊ संघटना ठिय्या आंदोलन करणार!!

भारती विद्यापीठ, विक्रमगड ( विद्यार्थी -८५ ) , ज्ञानेश्वर माऊली , पनवेल ( विद्यार्थी -८७ ) , सुषमा पाटील विद्यालय , पनवेल ( विद्यार्थी -१०६ ) असे एकूण २८७ विद्यार्थी नामांकित शाळांमधून दहावी उत्तीर्ण झाले. परंतु, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विक्रमगड आदिवासी प्रकल्प, जव्हारमार्फत अजून कुठेही प्रवेश मिळालेला नाही. यासंदर्भात जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी जव्हारमधील राजीव गांधी स्टेडियम येथील प्रकल्प कार्यालयासमोर जिजाऊ संघटना प्रवेश न झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासह ठिय्या आंदोलन करणार आहे.

पालकांमध्येही असंतोष!!

  • आदिवासी विकास प्रकल्प जव्हार प्रकल्प अंतर्गत नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेऊन २०२२ या सालामध्ये १० वी मध्ये पास झालेले विद्यार्थी गेले २ महिने घरीच राहून घरची काम करत आहेत.
  • त्यांना शासनाने शिक्षणापासून वंचित ठेवले असल्याची चिंता पालक वर्गात सुरू झाली आहे.
  • १० वी पास झालेल्या विद्यापयांचे अकरावीत प्रवेश अजून जव्हार प्रकल्पाने केलेला नाही , त्यांना अजून शाळा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने २२ ऑगस्ट २०२२ रोजी विक्रमगड , जव्हार , मोखाडा तालुक्यातील विद्याध्यांचे पालकांनी जव्हार प्रकल्प कार्यालय येथील अधिकारी यांच्याकडे माहितीची विचारणा केली असता प्रकल्प अंतर्गत एकूण ४१० विध्यार्थी असून त्यापैकी १३२ विध्याथ्यांना पाचगणी येथील नामांकित शाळेत प्रवेश मिळाला असल्याच सांगण्यात आले.
  • उर्वरित प्रश्न २७८ विद्यार्थ्यांचं काय ? १३२ मुलांना शासनाने शाळेत प्रवेश दिला.
  • मग उर्वरित २७८ या आदिवासी मुलांनी काय शेळ्यामेंढ्या चारायच्या का? असा प्रश्न पालकांनी संबंधित अधिकान्यांना विचारला.
  • ज्या शिक्षण संस्थेत मुलं शिक्षण घेऊन १० वी पास झालेत त्यांनी आमच्याकडे मुलांना शाळा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे, त्याप्रमाणे ए. सी कार्यालयाकडे मागणी केली असून आयुक्तांकडेही मागण केली आहे. व आयुक्तांनी मंत्रालयाकडे मागणी केली आहे. असेही प्रकल्प कार्यालयाकडून पालकांना सांगण्यात आलं आहे.

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं पत्र जसं आहे तसं:

प्रति,
मा. प्रकल्प अधिकारी,
आदिवासी विकास प्रकल्प जव्हार

विषय: – इयत्ता ११ वी प्रवेशाबाबत….

महोदय,

वरील विषयानव्ये आपणांस कळवितो कि, आपल्या प्रकल्पाअंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण घेवून उत्तीर्ण झाले आहेत. या संपूर्ण विद्याथ्यापैकी १३२ विद्यार्थ्यांना आपल्या कार्यालयामार्फत प्रवेश देण्याची प्रक्रिया झाली आहे . परंतु २७८ विद्यार्थांना अजूनही वरिष्ठ कार्यालयाकडून प्रवेशाबाबत आदेश नसल्यामुळे प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे .

वरील सर्व विद्यार्थी आदिवासी समाजातील असून सर्व विद्यार्थांची घरची परिस्थिती हलाकीची आहे . सदरच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी . सदर विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास या नुकसानास आदिवासी विकास प्रकल्प प्रशासन जबाबदार राहील . याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत आंदोलन केल जाईल . हे आपल्या माहिती करिता कळवित आहे. वरील विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास दिनांक: २९/०८/ २०२२ रोनी आंदोलन करण्यात येईल

१ ) विद्यार्थ्यांची यादी .
२ ) पालकांचा विनंती


Tags: College AdmissionjawharPalghartribal studentsvikramgadhआदिवासी विद्यार्थीजिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था
Previous Post

एका वर्षात देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या! विद्यार्थी, लघुउद्योजकांची संख्या चिंताजनक!!

Next Post

संतोष बांगरांना धक्का देणारा हिंगोलीत शिवसेनेतील पक्षप्रवेश! तर कोकणातून संघ परिवाराचं बंधन तोडत शिवबंधन!

Next Post
Shivsena Incoming from hingoli

संतोष बांगरांना धक्का देणारा हिंगोलीत शिवसेनेतील पक्षप्रवेश! तर कोकणातून संघ परिवाराचं बंधन तोडत शिवबंधन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!