Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

झारखंडमध्ये सरकार पाडण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्रातून कनेक्शन! राष्ट्रवादीचा आरोप!

भाजपाचे मोहित कंबोजसह माजी मंत्री सहभागी असल्याचा आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nawab malik (3)

मुक्तपीठ टीम

झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी भाजप नेते प्रयत्न करत आहेत. यामध्ये भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव समोर आले असून झारखंड पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये बावनकुळे यांच्यासह भाजप नेते मोहित कंबोज यांचंही नाव असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

  • मुंबईत आयोजित पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
  • एकीकडे महाराष्ट्रात अतिवृष्टी, दरडी कोसळून नागरिकांचे बळी जात असताना दुसरीकडे मात्र भाजप झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
  • भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते.
  • या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज यांची नावे आली आहेत.
  • अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याच्या पोलीस चौकशीतून हा धक्कादायक खुलासा समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
  • दरम्यान हा पत्रकार तीन आमदारांशी संपर्कात होता.
  • या आमदारांशी डील करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा एक माजी मंत्री देखील गेला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
  • तसेच २१ जुलै रोजी भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहीत कंबोज, अमित यादव, आशुतोष ठक्कर हे लोक पैसे घेऊन झारखंड येथे दाखल झाले.
  • मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला.
  • आमदार फोडाफोडीच्या या कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी झारखंड सरकारने एसआयटीची तीन पथके स्थापन केली असून यापैकी एक पथक झारखंडमध्ये, तर दुसरे दिल्लीत आणि तिसरे पथक महाराष्ट्रात तपासासाठी येणार आहे.
  • महाराष्ट्रातील दोन आमदारांचा देखील त्यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • झारखंडची एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पुर्ण सहकार्य केले जाईल.
  • राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक दुःखात असताना भाजपचे लोक झारखंडचे आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत.
  • एका – एका आमदारासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविण्यात आले.
  • पूरपरिस्थितीत हेच पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते, मात्र झारखंडचे सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे.
  • कर्नाटक सरकार पाडत असताना मुंबई कनेक्शन दिसून आले होते.
  • आता झारखंड सरकार पाडतानाही महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे.
  • लोकशाहीला डावलून सरकार स्थापन करण्याचे भाजपचे कारस्थान आता समोर आले असून झारखंड पोलीस नक्कीच याचा तपास करतील.
  • यावेळी नवाब मलिक यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पत्रकार अभिषेक दुबे यांनी पोलीस चौकशीत उघड केले आहे.
  • यामुळे पैशांचा घोडेबाजार करुन झारखंड सरकार बदलण्याचा डाव उघड झाला आहे.
  • महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही.
  • भाजपला ते शक्य नाही असेही नवाब मलिक यांनी भाजपला ठणकावून सांगितले आहे.

Tags: BJPchandrashekhar bawankuleJharkhandMohit kambojNawab Malikचंद्रशेखर बावनकुळेझारखंडनवाब मलिकभाजपमोहित कंबोज
Previous Post

“भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन, कायमस्वरुपी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच!” – अजित पवार

Next Post

भलतंच विधान…मायक्रोफोन ऑन…आणि मग न्यायाधीशांकडून वकील सुनावणीतून बाहेर!

Next Post
Mumbai high court

भलतंच विधान...मायक्रोफोन ऑन...आणि मग न्यायाधीशांकडून वकील सुनावणीतून बाहेर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!