मुक्तपीठ टीम
एकेकाळी नंबर वन असलेली जेट एअरवेज सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच एनसीएलटीने प्रस्ताव मागवले होते. त्यात ग्रेट ब्रिटननधील कलरॉक कॅपिटल आणि आखातातील उद्योजक जालान यांच्या कन्सोर्टियमने प्रस्ताव सादर केलाय. त्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर चार ते सहा महिन्यांत जेटचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा आहे.
जेट एअरवेज आर्थिक संकटामुळे डबघाईला आल्यानंतर कामकाज ठप्प झाले. एनसीएलटीने कलरॉक-जालान कन्सोर्टियमच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आम्ही काम सुरु करण्यासाठी सज्ज आहोत असे मुरारीलाल जालान यांनी सांगितले आहे. जेट एअरवेजला पुन्हा कार्यरत करण्याची योजनेवर योग्यरीत्या काम सुरु आहे.
कोरोना संकटाने जगभरातील विमान उद्योगाला हादरवले आहे. पण भारतीय विमान क्षेत्राबद्दल आपण खूप सकारात्मक असल्याचे मत जालान यांनी मांडले. ते म्हणाले की, सुरुवातीला जेट एअरवेज २५ विमानांनी उड्डाण पुन्हा सुरू करेल.
जेट एअरवेज पुन्हा भरारी घेणार…
• जेटची १७ एप्रिल २०१९ पासून उड्डाणे झालेली नाहीत.
• गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युकेचे मुख्यालय असलेल्या कलरॉक कॅपिटल आणि युएई स्थित उद्योजक जालान यांचा समावेश असलेला कन्सोर्टियम जेट एअरवेजसाठी प्रस्ताव सादर केला.
• आता लवकरच २५ विमानांची सेवा देण्याची घोषणा केली आहे.
• सुरुवातीला प्रवासी सेवा सुरू करण्यात येईल.
• त्यानंतर मालवाहू, आंतरराष्ट्रीय किंवा इतर सर्व सेवा सुरू करणार
• भारतीय स्टेट बँकच्या नेतृत्वाखालील सीसीने हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
• आयबीसीअंतर्गत ही योजना राबविण्यापूर्वी एनसीएलटीची मंजुरी आवश्यक आहे.
• कन्सोर्टियमने विमानतळ स्लॉटच्या मुद्यावर नागरी उड्डाण मंत्रालयाशी यापूर्वी चर्चा केली आहे.
• एकदा विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यावर योग्य विमाने आणि मानव संसाधनांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
• सुरवातीस मार्ग ठरविणे ही आणखी एक महत्त्वाची बाब आहे, तेही लवकरच होईल.
पाहा व्हिडीओ: