Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जेट एअरवेज झाली आता उड्डाणासाठी सज्ज, जाणून घ्या नेमकं कसं घडणार?

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Jet Airways

मुक्तपीठ टीम

जेट एअरवेज पुन्हा हवेत उड्डाण करण्यासाठी सज्ज होत आहे. एकेकाळची नंबर वन विमान कंपनी पुन्हा सुरु करण्यासाठी बोली लावली गेली. ती जिंकणाऱ्या जालान-फ्लोरिअन फ्रिश या समूहाने ते एअरलाइनमध्ये पैसे गुंतवण्यास तयार असल्याचे कळवले. तसेच त्यासाठी कर्ज निराकरण योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया जलद करण्याचे प्रयत्नही सुरु केले आहेत. मुरारी लाल जालान आणि फ्लोरिअन फ्रिश यांनी जाहीर केलेल्या निवेदनानुसार, रिझोल्यूशन प्लॅनच्या जलद अंमलबजावणीसाठी त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलशी संपर्क साधला आहे. ते २०२२मध्ये जेट एअरवेजचे देशांतर्गत ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.

 

दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (आयबीसी) अंतर्गत केलेल्या कर्ज निराकरण प्रक्रियेचा भाग म्हणून जालान-फ्लोरिअन फ्रिश समूहाने सादर केलेल्या योजनेला एनसीएलटीने गेल्या जूनमध्ये मान्यता दिली होती. मंजूर योजनेनुसार जेट एअरवेजचे माजी कर्मचारी, कामगार आणि कर्ज देणार्‍या संस्थांसह सर्व भागधारकांची थकबाकी भरण्यात येईल. त्यांना आवश्यक भांडवल मिळाले असून आता योजना जलदगतीने राबवायची असल्याचे त्यांनी सांगितले.

 

त्यांनी एनसीएलटीकडे केलेल्या अर्जात, २२ डिसेंबर २०२१ पासून ही योजना लागू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे नमूद केले आहे. जेट एअरवेजच्या ऑपरेशनच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची प्रक्रियाही वेगवान करण्यात आली आहे. ऑपरेशनल मुद्द्यांवर ते अधिकारी आणि विमानतळ ऑपरेटरच्या संपर्कात आहेत. समूहाचे प्रमुख सदस्य जालान म्हणाले की, “आम्हाला २०२२ च्या सुरुवातीला देशांतर्गत विमान सेवा सुरू करायची आहे. आम्ही जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन करत असताना नवा इतिहास रचण्यास उत्सुक आहोत.” २०१९ मध्ये मोठ्या कर्जाच्या ओझ्यामुळे जेट एअरवेजला आपले ऑपरेशन बंद करावे लागले होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: airlineDebt settlement processgood newsJalan-Florian FrisJET AirwaysmuktpeethNCLTready for flightएनसीएलटीकर्ज निराकरण प्रक्रियाकर्ज निराकरण योजनाजालान-फ्लोरिअन फ्रिशजेट एअरवेजविमान कंपनी
Previous Post

कोरोनाचं संकटं, घटता लोकाश्रय, तरी मुंबईतही टिकून आहे वासुदेवाची परंपरा

Next Post

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या भगिनींचे आदर्श गावाची संकल्पना

Next Post
ideal-village-of-sisters-of-jijau

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या भगिनींचे आदर्श गावाची संकल्पना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!