मुक्तपीठ टीम
भाजपा आणि जेडीयूमधील कटुता वाढल्याचा स्पष्ट दिसत आहे, याच कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नीती आयोगाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत उपस्थिती नव्हते. यानंतर जेडीयूने मोदी मंत्रिमंडळात सामील न होण्याची घोषणा केली आहे. याआधीही नितीश यांनी महत्त्वाच्या बैठकांपासून दूर राहत भाजपावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता कदाचित नितिश कुमारांचा जनता दल भाजपाशी नातं तोडत लालूप्रसाद यादवांच्या राजदशी हातमिळवणी करण्याचीही शक्यता आहे.
चिरागच्या प्रकरणानंतर आरसीपी प्रकरणावरून नितीश कुमार भाजपावर नाराज आहेत. गेल्या काही महिन्यांत नितीश यांनी अनेक महत्त्वाच्या बैठकांपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी कोरोनावर बोलावलेल्या बैठकीत नितीश उपस्थित राहिले नाही. अलीकडेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभातही त्यांनी स्वतःला दूर ठेवले. यापूर्वी गृहमंत्री अमित शाहा यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपासून दूर राहिल्यानंतर आता नीती आयोगाच्या बैठकीत ते उपस्थित नव्हते.
…म्हणूनच नितीश संतापले
- बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले, पण यावेळी भाजपाच्या तुलनेत निम्म्या जागा मिळाल्याने त्यांचा दर्जा घसरला.
- त्यांना पूर्वीसारखे सरकार चालवता येत नाहीय.
- त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपाने पडद्याआडून चिराग पासवानच्या माध्यमातून जेडीयूचे नुकसान केले, असे नितीशचे मत आहे.
- त्यानंतर हीच युक्ती आरसीपीच्या माध्यमातून करण्यात आली.
अत्यंत मागास आणि दलितांमध्ये भाजपचा जनाधार वाढला असला तरी, पक्षाकडे मजबूत चेहरा नाही. भाजपाला माहिती आहे ती, त्यांना स्वबळावर सत्ता काबीज करता येणार नाही. यामुळे बिहारमध्ये दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढला असताना, राष्ट्रीय आघाड्यांच्या बैठकीनंतर भाजपाने राज्यात नितीशच आपले नेते असल्याचे स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक नितीश यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणाही पक्षाने केली.
सीएम नितीश यांच्या विरोधात षडयंत्र रचले गेले: जेडीयू
- जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह म्हणाले, भविष्यात मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्यात जेडीयूचा समावेश केला जाणार नाही.
- मुख्यमंत्री नितीश यांचा हा निर्णय आहे.
- एवढेच नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती अद्याप ठरलेली नसल्याचे लालन यांनी स्पष्ट केले.
- सिंह म्हणाले की, नितीश यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे.
- त्यांची उंची कमी करण्याचे षडयंत्र रचण्यात आले.
- २०२० च्या विधानसभा निवडणुकीत चिराग मॉडेल बनवून त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले गेले आणि आता आरसीपीला मॉडेल बनवले जात आहे.
- वेळ आल्यावर पक्षांतर्गत कोणते कारस्थान सुरू होते हेही स्पष्ट केले जाईल.