Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाई, बेरोजगारी या मुळ विषयांवर कोण बोलत नाही – जयंत पाटील

April 18, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Jayant Patil reviewed Patan Assembly constituency in Satara

मुक्तपीठ टीम

आज महागाई, बेरोजगारी, आरोग्ययंत्रणा या मुळ विषयावर कोण काही बोलत नाही. मात्र ईडी, आयटी, सीबीआय, भोंगा यावर चर्चा सुरू आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Jayant Patil reviewed Patan Assembly constituency in Satara

आज सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. पवित्र गंगेतून मृतदेह वाहताना आपण सर्वांनी पाहिले मात्र महाराष्ट्रात आपण कोरोना काळात एक चांगली कामगिरी केली हेही जयंत पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

Jayant Patil reviewed Patan Assembly constituency in Satara
आपण चांगल्या कामाच्या जोरावर मतं मागू. सर्व आधुनिक व्यवस्था आत्मसात करू आणि एक चांगले यश संपादित करू असे प्रतिपादनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.

Jayant Patil reviewed Patan Assembly constituency in Satara
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आज साताऱ्यातील शेवटचा दिवस असून संपूर्ण राज्य फिरून आल्यानंतर ही यात्रा साताऱ्यात पोहोचली होती. कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या या अडचणींची गांभीर्याने नोंद घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी आश्वासन दिले.

 

मागच्या निवडणुकीत पाटण इथे पराभव झाला. इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता मात्र मला इथल्या लोकांचे कौतुक करावेसे वाटते. कार्यकर्त्यांनी इथे पक्ष जिवंत ठेवला आहे. नाराजी असताना लोकांनी पक्षाची साथ सोडली नाही. ही आपल्या पक्षाची जमेची बाजू आहे. ही ताकद एकसंघ करण्याची वेळ आली आहे त्यासाठी बुथ कमिट्यांचे संघटन करा. आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही असा आत्मविश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.

 

सगळ्या स्थानिक संस्थांमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत आहे. आता पक्ष वाढवायचा आहे, याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. पक्षाची नव्याने बांधणी करू, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत. आमचे सैन्य तयार आहे असे सत्यजित पाटणकर यांनी सांगितले.

 

रामालाही वनवास भोगावा लागला होता तशी आजची परिस्थिती आहे. नव्याने आपण उभे राहूया. मी वडिलधारी आहे, तुम्हाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पक्ष आपल्या पाठिशी खंबीर आहे. संघटना मजबूत करा असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

 

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, संकल्प डोळस, महिला सरचिटणीस संगीता साळुंखे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, तालुका महिला अध्यक्षा स्नेहलताई जाधव, युवती अध्यक्षा रोहिणी पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Tags: inflationjayant patilMaharashtrasataraunemploymentजंयत पाटीलबेरोजगारमहागाईसातारा
Previous Post

#मुक्तपीठ #Live माधव भांडारी: महाराष्ट्रात वीज टंचाई मध्यस्थांमार्फत वीज खरेदीसाठी?

Next Post

धर्मांध हरणार, महाराष्ट्र जिंकणार!

Next Post
politics on use of loudspeaker on mosque in Maharashtra

धर्मांध हरणार, महाराष्ट्र जिंकणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!