Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भाजप नेते रेमडेसिवीर औषध असं कसं खरेदी करतात? नविन कायदा आलाय?” – जयंत पाटील

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
“भाजप नेते रेमडेसिवीर औषध असं कसं खरेदी करतात? नविन कायदा आलाय?” – जयंत पाटील

मुक्तपीठ टीम

“राज्यसरकारला… स्थानिक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती न देता लोकांचे प्राण वाचवणारं रेमडेसिवीरसारखं औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात? नविन कायदा आला आहे का?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
एका साठेबाजाची बाजू घेण्यासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये जातात या भाजपाच्या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
दरम्यान साठेबाजाला चौकशीला बोलावून दोन तास चौकशी केल्याबद्दल जयंत पाटील यांनी पोलिसांचे कौतुक देखील केले आहे. पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आहे असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं. त्यानंतर राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत आहोत, असं म्हटलं होतं. तसंच काही दिवसापूर्वी भाजपचे नेते दमणला जाऊन आले आणि ५० हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन आम्ही महाराष्ट्रात वाटू असं ट्वीट केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Tags: BJPjayant patilNCPpravin darekarremdesivirजंयत पाटीलप्रवीण दरेकरभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसरेमडेसिवीर
Previous Post

अजित पवारांनी दिले रेमडेसिवीर काळाबाजार रोखण्याचे आदेश…पकडला गेलेला राष्ट्रवादी समर्थक?

Next Post

राज्यात धोका वाढताच…आज ६८ हजार नवे रुग्ण! ४५ हजार घरी परतले!

Next Post
MCR 15-4-21

राज्यात धोका वाढताच...आज ६८ हजार नवे रुग्ण! ४५ हजार घरी परतले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!