Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दमणगंगा, एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत” – जयंत पाटील

July 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
jayant patil

मुक्तपीठ टीम

दमणगंगा, एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत, असे निर्देश आज जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी योजनेसंदर्भात क्षेत्रिय स्तरावरील तांत्रिक बाबीबद्दल काही महत्वाच्या उपाययोजना सुचविल्या. ज्यामुळे या प्रकल्पाची किंमत कमी होऊ शकेल असे सांगितले.त्यासंदर्भात विभागाने प्रशासकीय मान्यता व इतर बाबींकरीता प्रस्ताव त्वरीत सादर करावे, असे निर्देश मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल. तसेच सिंचनात‍ वाढ होईल असेही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) हा राष्ट्रीय जलविकास अभिकरण (एनडब्ल्युडीए) नवी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून हे काम प्रगतीपथावर आहे. सप्टेंबर २०२१ अखेर अहवाल जलसंपदा विभागास सादर होऊ शकेल अशी माहिती अधीक्षक अभियंता अ.रा.नाईक यांनी दिली.

यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) ए.एन.मुंडे, मुख्य अभियंता नाशिक प्रादेशिक विभाग, डॉ.संजय बेलसरे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

 


Tags: jayant patilMahavikaras Aghadi governmentजलसंपदामंत्री जयंत पाटील
Previous Post

नव्या मंत्र्यांसाठी मोदींची कडक आचार संहिता! मंत्री होण्याएवढंच ‘ती’ पाळणं कठीण!!

Next Post

हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण

Next Post
uddhav_thackeray

हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!