मुक्तपीठ टीम
राज्यातील आघाडी सरकारामधील नेत्यांवर विरोधीपक्षातील नेतेमंडळी भष्ट्राचाराचे आरोप करत त्यांच्या पाठी ईडीची पीडी सोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं? ईडी आणि सीबीआयची कार्यालये म्हणजे भाजपाची कार्यालये झाली आहेत असा हल्लाबोल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
भाजपा चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहतेय
- एका पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटलांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
- ‘भाजपा चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे.
- ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे.
- त्यासाठी आपले संघटन मजबूत करायला हवे.
- एजन्सीचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे.
- सुडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही.
- मात्र, भाजपकडून ऐनकेन प्रकारे सुरू आहे.
भाजपात प्रवेश केल्यानंतर ईडी, सीबीआयकडून संरक्षण
- पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही.
- मात्र त्यांना गोवण्याचे काम केले जात आहे.
- असेच इतर मंत्र्यांच्याबाबतही घडते आहे.
- जे खरे मनी लॉण्ड्रींग करीत आहेत, त्यांना सोडून दिले आहे आणि जे करीत नाहीत, त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले जात आहे.
- अशा प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, मात्र ते भाजपात गेले आहेत त्यांचे काय झाले? राज्यात असे अनेक लोक आहेत, जे सध्या भाजपत आहेत.
- ज्यांना ईडीने नोटिसा दिलेल्या आहेत.
- त्यांच्या चौकशीचे काय झाले.
- पाहिजे तर आम्ही त्याची यादी देतो.
- भाजपामध्ये गेले की त्यांना ईडी, सीबीआयकडून संरक्षण दिले जात आहे.
कार्यालये म्हणजे भाजपची आहेत का?
- एकाने दुसऱ्या शंभर कोटीची मागणी केली आहे, याबाबतच्या संभाषणाची क्लीप मिळाली म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईंडी कारवाईच्या कक्षेत घेतले.
- प्रत्यक्षात पैसे दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. ईडीकडून चौकशी होणार म्हटल्यानंतर पदावर राहणे योग्य नव्हते म्हणून त्यांनी स्वत:च राजीनामा दिला.
- अर्धे मंत्रीमंडळ दवाखान्यात दिसेल, असे किरिट सोमय्या म्हणाले आहेत.
- सोमय्या यांना हे कसे माहिती? तेच ईडी, सीबीआय, आयकर खाते चालवता ही कार्यालये म्हणजे भाजपची आहेत का?