Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जायकवाडीच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हावे” – जयंत पाटील

January 22, 2022
in घडलं-बिघडलं
0
jayant patil instruction on canals of Jayakwadi Dam

मुक्तपीठ टीम

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जायकवाडी धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने व्हायला हवे, अशी संकल्पना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मांडली.

            

मंत्रालय येथे आज कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ तसेच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठक झाल्या. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. 

            

जायकवाडी हे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणारे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने व्हायला हवे. दरवाजे सेंट्रलाईज पद्धतीने उघडावे, पाण्याची चोरी झाली तर त्याची तत्काळ माहिती मिळावी अशा सर्व व्यवस्था असायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            

परभणी, नांदेड भागात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नाही. या भागातील कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवायचे असेल तर ही व्यवस्था करावीच लागेल. या संकल्पनेबाबत जागतिक पातळीवर अभ्यास केला जावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

             

या बैठकीत महामंडळांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला गेला. तसेच विविध प्रकल्पांत येणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात आली. जलसंपदा प्रकल्प गतीने पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना जयंत पाटील यांनी दिल्या. या प्रश्नांची सोडवणूक करून या भागातील सिंचन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न येत्या काळात केली जाईल, असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.


Tags: jayakwadi damjayant patilजंयत पाटीलजायकवाडी धरण
Previous Post

क्रिकेटर, कॉमेडियन आणि डॉक्टर दांपत्य सांगलीचे स्वच्छता ब्रँड अँबेसिडर

Next Post

‘महाराष्ट्र चेंबर पत्रिके’चे ५१ व्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे माहिती महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
DG sir, Maharashtra chamber of commerce’s book Prakashan

‘महाराष्ट्र चेंबर पत्रिके’चे ५१ व्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे माहिती महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!