मुक्तपीठ टीम
सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे,याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे यासर्वावर विचार राष्ट्रवादीच्या बैठकीत केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत, तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहेत अशामध्ये राज्यसरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून काम करत असेल तर हे दुर्दैवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमी आहे अशा शब्दात जयंत पाटील शिंदे – फडणवीस सरकारवर यांनी हल्लाबोल केला.
कॉंग्रेस आणि आप यांच्या मतांमध्ये विभागणी झाली त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये मिळाला आहे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले.