मुक्तपीठ टीम
रिटेल विक्रीसाठी सर्वसमावेशक वित्तपुरवठा यंत्रणा तयार करण्याच्या हेतूने जावा येझ्दी मोटरसायकलने स्टेट बँक ऑफ इंडियाशी (एसबीआय) करार केला आहे. या करारानुसार कंपनीचे चॅनेल पार्टनर्स तसेच देशभरातील ग्राहकांना निधी आणि वित्त योजना उपलब्ध करून दिल्या जातील.
एसबीआयशी झालेल्या कराराविषयी जावा येझ्दी मोटरसायकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, ‘स्टेट बँक ऑफ इंडियाचे वित्त भागीदार म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. एसबीआय ही देशातील सर्वात मोठ्या वित्त संस्थांपैकी एक असून बँकेचे नेटवर्क दूरवर विस्तारलेले आहे. या धोरणात्मक सहकार्यामुळे आमचे ग्राहक तसेच चॅनेल पार्टनर्सना वित्त पुरवठ्याचे विविध पर्याय मिळतील व त्यामुळे आमची उत्पादने आणि सेवा त्यांच्यासाठी सहजपणे उपलब्ध होईल.’
जावा येझ्दी मोटरसायकलचे देशभरात ३७५ टचपॉइंट्स, ७ रिटेल मॉडेल्स जावा आणि येझ्दी ब्रँड्सअंतर्गत विस्तारलेले आहेत. कंपनी सातत्याने देशभरात आपले अस्तित्व विस्तारत असून यापुढेही त्यात भर घातली जाईल. एसबीआयशी झालेला करार ब्रँडच्या सातत्याने विस्तारत असलेल्या चॅनेल पार्टनर्स नेटवर्कसाठी अतिशय महत्त्वाचा असून एसबीआयच्या नेटवर्कमुळे त्यांना आपल्या दारात वित्त पुरवठ्याचे पर्याय मिळतील.