Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी स्वच्छतेसाठी जपान भारताला सहकार्य करणार

April 15, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Ganga Cleaning

मुक्तपीठ टीम

नदी स्वच्छता आणि त्यासाठी सांडपाण्याचं व्यवस्थापन हे सध्या देशभर कळीचे मुद्दे ठरत आहे. कोरोना महामारीनंतर सामान्यांनाही स्वच्छतेचं आणि आरोग्याचं महत्व कळलं. त्यातूनच मग नद्यांच्या स्वच्छतेवरील लक्षही वाढलं. तसंच त्यासाठी आवश्यक सांडपाणी व्यवस्थापनाचं महत्वही पटलं. त्यामुळेच आता भारताने जपानशी त्यासाठी करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जपानशी केलेल्या स्थानिक सांडपाणी व्यवस्थापनविषयक सहकार्य कराराला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान (DoWR, RD&GR) आणि जपानचे पर्यावरण मंत्रालय यांच्यात हा करार झाला आहे.

 

अंमलबजावणीचे धोरण आणि लक्ष्य

एका व्यवस्थापन परिषदेची स्थापना करण्यात येईल जी सहकार्य विषयक सविस्तर उपक्रमांची रचना करून आणि तिच्या प्रगतीवर देखरेख करून या सहकार्य कराराच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असेल.

 

प्रमुख परिणाम:

या सहकार्य कराराच्या माध्यमातून जपानसोबत केले जाणारे सहकार्य जोहकासौ तंत्रज्ञानाचा वापर करून विकेंद्रित स्थानिक सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा प्रभावी पुनर्वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फलदायी ठरेल. सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची विकेंद्रित जोहकासू प्रणाली जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या घरांमधून बाहेर सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनामध्ये त्याचबरोबर नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत अशाच परिस्थितीमध्ये असलेल्या गोड्या पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वततेसाठी अधिक परिणामकारक ठरेल. स्थानिक शासन संस्थांना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या गुंतागुंतीच्या विषयावर त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल.

 

खर्च किती?

या सहकार्य करारांतर्गत दोन्ही पक्षांवर कोणत्याही प्रकारचे आर्थिक जबाबदारी नाही. या सहकार्य करारांतर्गत उपक्रम सुरू करण्यासाठी व्यवहार्यता-पूर्व अहवाल, व्यवहार्यता अहवाल आणि प्रकल्प अहवाल अशी विविध प्रकारची प्रकरण संबंधित कागदपत्रे तयार करता येऊ शकतील, संबधित क्षेत्रांमधील सविस्तर तपशीलाचा त्यात समावेश असेल त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणाशी संबंधित कार्यक्रम आणि प्रकल्प यांच्यासाठी सविस्तर आर्थिक व्यवस्था करता येईल.

 

मुद्दे निहाय तपशील:

१९-३-२०२२ रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा जलसंपदा , नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान(DoWR, RD&GR)विभाग आणि जपानचे पर्यावरण मंत्रालय यांच्या दरम्यान विकेंद्रित स्थानिक सांडपाणी व्यवस्थापन विषयक सहकार्य करार करण्यात आला. हा करार सार्वजनिक जल क्षेत्रातील जल पर्यावरणाच्या संवर्धनात विकेंद्रित स्थानिक सांडपाणी व्यवस्थापनात सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या आणि दोन्ही देशांमधील समानतेच्या आणि परस्पर फायद्याच्या मूल्यांवर आधारित सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने करण्यात आला. भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभाग आणि जपानचे पर्यावरण मंत्रालय यांच्यात हा सहकार्य करार विकेंद्रित स्थानिक सांडपाणी व्यवस्थापनाची क्षमता निर्माण करणे, बळकट करणे आणि त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे या उद्देशाने करण्यात आला. या करारामध्ये विशेषत्वाने विकेंद्रित स्थानिक सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा प्रभावी पुनर्वापर यामधील सहकार्यावर भर देण्यात आला आहे. ज्यामुळे या संदर्भातील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल आणि परिसंवाद, परिषदा आणि क्षमतावृद्धी यांच्या माध्यमातून त्याविषयीच्या माहितीची आणि तज्ञांची देवाणघेवाण यांचा समावेश यात असू शकेल मात्र यापुरता हा करार मर्यादित राहणार नाही.

 

या सहकार्य करारांतर्गत विविध उपक्रम सुरू करण्यासाठी व्यवहार्यता-पूर्व अहवाल, व्यवहार्यता अहवाल आणि प्रकल्प अहवाल अशी विविध प्रकारची प्रकरण संबंधित कागदपत्रे तयार करता येऊ शकतील. संबधित क्षेत्रांमधील सविस्तर तपशीलाचा त्यात समावेश असेल त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणाशी संबंधित कार्यक्रम आणि प्रकल्प यांच्यासाठी सविस्तर आर्थिक व्यवस्था करता येईल. यासाठी दोन्ही बाजू व्यवस्थापन परिषदेची(MC) स्थापना करतील, जी सहकार्य विषयक सविस्तर उपक्रमांची रचना करून आणि तिच्या प्रगतीवर देखरेख करून या सहकार्य कराराच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असेल.

 

पार्श्वभूमी:

जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय इतर देशांसोबत धोरणे आणि तांत्रिक विशेषज्ञांची देवाणघेवाण, प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे आयोजन, कार्यशाळा, शास्त्रीय आणि तंत्रज्ञान परिसंवाद, तज्ञांची देवाणघेवाण आणि अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करून जलसंपदा विकास आणि व्यवस्थापनामध्ये द्विपक्षीय सहकार्याला चालना देत आहे. सध्याचे भारत-जपान सहकार्य विचारात घेऊन विकेंद्रित प्रक्रिया क्षेत्रातील जपानचा अनुभव आणि तज्ञ यांची देवाणघेवाण करण्यासाठी एक करार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: DoWRGood news MorningIndiaJapanRD&GRSewage treatmentजपाननदी स्वच्छताभारतसांडपाण्याचं व्यवस्थापन
Previous Post

वाड्यात रंगतेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, राज्यभरातील नावाजलेल्या संघाचा समावेश

Next Post

वनप्लसचा 5G फोन OnePlus 10 Pro भारतात लाँच, नव्या तंत्रज्ञानाची साथ!

Next Post
One plyus 10 pro

वनप्लसचा 5G फोन OnePlus 10 Pro भारतात लाँच, नव्या तंत्रज्ञानाची साथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!