मुक्तपीठ टीम
एकीकडे माध्यम क्षेत्रात अदाणी समुहाच्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे माध्यम जगातीतील दोन दिग्गजांनी अंबानींच्या माध्यम कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि डिस्नी इंडियाचे माजी प्रमुख उदय शंकर यांच्या बोधी ट्री सिस्टीम या गुंतवणूक कंपनीने रिलायन्स समुहाच्या Viacom18मध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. बोधी ट्री सिस्टीमने बुधवारी सांगितले की ते Viacom 18मध्ये १.८ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींनीही या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे स्ट्रीमिंग मार्केटमध्ये वाढ होण्यास मदत होईल. रिलायन्सकडे Viacom18 मध्ये ५१ टक्के भागीदारी आहे आणि उरलेला भाग ViacomCBS कडे आहे. ViacomCBSने अलीकडेच आपले नाव बदलून Paramount Global केले आहे. Viacom 18तर्फे Voot नावाचे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवले जाते. तसेच Nickelodeon आणि Comedy Centralसारखी टीव्ही चॅनेल्सही आहेत.
रिलायन्सने इतिहास रचला
ही मोठी गुंतवणूक येत असतानाच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने नवा विक्रम नोंदवला आहे. ती १९ लाख कोटी रुपयांचे बाजार मूल्य असणारी भारतातील पहिली कंपनी बनली आहे.
स्ट्रिमिंगची वाढती लोकप्रियता!
- भारतीयांमध्ये स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.
- कोरोनामुळे घराबाहेरचे चित्रपट, नाटक, खेळ असे कोणतेही मनोरंजन शक्य नव्हते.
- तेव्हा घरातल्या घरात मोबाइल किंवा अन्य ठिकाणी दिसणारे स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन उरले होते.
- स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे चित्रपट आणि वेब सिरीज लाँच करण्यात आल्या.
- लॉकडाऊनमध्ये लोकांसाठी मनोरंजनासाठी ते एक उत्तम साधन म्हणून उदयास आल्याने त्यांची मागणी वाढली.