Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाऊमेद झालेल्या प्रजेला राज्याभिषेकामुळे राज्यकर्ता होण्याचा आत्मविश्वास मिळाला- कवाडे

पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

June 6, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
rajyabhishek

मुक्तपीठ टीम

छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी महाराजांनी मोडून काढली. समता, बंधुता स्थापित करून छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आधुनिक लोकशाहीचा पाया रचला असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सीताबर्डी, आंनदनगरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अखिल भारतीय मुख्यालयात शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

पुढे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक रायगडावर यथाविधी पार पडला.आज आपण संसदीय लोकशाहीत आहोत. आपल्याला संविधानाने अनेक हक्क अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. तसेच विहित अटी पूर्ण करणार्‍यांना निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्रीपदी कोणत्याही जाती-धर्माचा व्यक्ती लोकशाही मार्गाने निवडला जातो. विद्यमान नेतृत्व हे वंशपरंपरेने नव्हे, तर कर्तृत्वाने आणि लोकनियुक्त आहे. शिवरायांचे कार्य म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकार्य होय. शिवाजीराजे म्हणजे जगातील आदर्श नेतृत्व आहे. महाराज जगातील अनेक उत्तम व्यवस्थांचे निर्माते आहेत. त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही जगभर एक प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रत्यक्षात राजेशाही असतानाही तिचे रूपांतर लोकशाहीत करून एक आदर्श शासन व प्रशासन व्यवस्था तयार केली. म्हणजेच शिवाजी महाराजांचे राज्य लोकाभिमुख होते. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा बळीराजाला छत्रपतींच्या स्वराज्यात सुखी ठेवले. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य असल्याचेही ते म्हणाले.

 

मध्ययुगीन काळामध्ये अशी परिस्थिती नव्हती. शूद्रातिशूद्रांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, नेतृत्व करणे ही संकल्पना खूप कठीण होती. येथील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींना फक्त कष्ट करायचे, लढायचे, पण प्रतिनिधित्वचे स्वप्न पहावयाचे नाही, हा तो काळ होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करतात, ही एक महान क्रांतिकारक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायक घटना आहे.राज्याभिषेक ही दबलेल्या, नाउमेद झालेल्या, पिचलेल्या, हताश झालेल्या एतद्देशीयांना नवचैतन्य देणारी घटना आहे.छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. त्यांच्या राज्याभिषेकाला अनेक अडचणी आल्या. त्यावरती त्यांनी मात केली. त्यांच्या अत्यंत कणखर आणि दूरदृष्टीच्या मातोश्री जिजाऊमासाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवाजीराजे संकटसमयी लढणारे होते, रडणारे नव्हते. रात्रंदिन काबाडकष्ट करणाऱ्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी घाम गाळला, रक्त सांडले असेही, राज्याभिषेकाने शिवाजी महाराज अधिकृत राजा झाले. ते छत्रपती झाले. राज्यकारभार करण्याचा त्यांना अधिकार मिळाला. राज्याभिषेकाने त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. रयतेला राजा मिळाला. हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली. हा राजकीय स्वातंत्र्याचा उद्घोष होतात. नाऊमेद झालेल्या प्रजेला राज्यकर्ता होण्याचा आत्मविश्वास राज्याभिषेकाने मिळाला. राज्याभिषेकानंतर शिवाजीराजांनी स्वतःचा शिवशक सुरू केला. राज्याभिषेकाने शिवाजी महाराज शककर्ते झाले. त्यांनी स्वतःची चलन व्यवस्था सुरू केली. सोन्याचे होन व तांब्याची शिवराई ही त्यांची चलन व्यवस्था होती.आधुनिक लोकशाहीचा पाया रचला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी रायगड किल्ला निवडला .या प्रसंगी प्रामुख्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र संघटक कपिल लिंगायत,अजय चव्हाण,विपीन गाडगीलवार,रोशन तेलरांध्ये,सिद्धार्थ, ॲड. अरुण महाकाले, भीमराव कलमकर, मुकेश खोब्रगड़े, ऍड.राणा महाकाले, उत्तम हुमणे, दिलीप नितनवरे, कुशिनारा सोमकुवर,स्वप्नील महल्ले, महेन्द्र पावाडे, राहुल देशभ्रतार,डॉ. सूचित रामटेके, निकेश वानखेड़े,पियुष हलमारे,निरज पराडकर,अक्षय नानवटकर ,दिलीप पाटील,भूषण डोंगरे, भीमराव मेश्राम, रोशन चव्हाण, प्रकाश अचकार पोहरे, सुमीत सावकर, कृषीनारा शांमकुंवर, विजय बन्सोड, मंगेश कांबळे, मारूती धोटे,विशाल घुगरे,सागर वानखेडे,समाधान वानखेडे,ऋषी वैद्य,निलेश बोरकर,दीपेन डकाह,अमन कांबळे,नरेंद्र केराम, अनुप आगलावे,रोशन मेश्राम, निशात सरकते,पियुष चव्हाण, नरेश दुपारे, भीमराव नानवटकर,दारियस संजना, कुशल ठाकूर,आदित्य मिश्रा,प्रशांत खरे,योगेश पंड्या,अरुप घोष आदी उपस्थित होते.


Tags: Chhatrapati Shivaji Maharajjaideep kawadepeople's republican partyछत्रपती शिवाजी महाराजजयदीप जोगेंद्र कवाडेपीपल्स रिपब्लिकन पक्षराज्याभिषेक
Previous Post

कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Next Post

“कोरोना आव्हान कायम, निर्बंध सरसकट शिथिल नाहीत, गर्दी नाही, म्हणजे नाहीच”!

Next Post
uddhav thackeray

"कोरोना आव्हान कायम, निर्बंध सरसकट शिथिल नाहीत, गर्दी नाही, म्हणजे नाहीच"!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!