मुक्तपीठ टीम
हिमालयातील मानसलू हे जगातील आठव्या क्रमांकाचे उंच शिखर मानले जाते. गिर्यारोहकांना सातत्यानं हे शिखर आव्हान देत असतं. यावेळी हे आव्हान स्वीकारलं सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी सतत सज्ज असणाऱ्या इंडो तिबेटियन पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी. सीमेवरील धाडसासारखीच त्यांना आवड आहे ती उत्तूंग शिखरं सर करण्याची. त्या आवडीतूनच त्यांनी आजवरच्या गिर्यारोहण मोहमांमप्रमाणेच मोहीम आखली आणि मानसलू हिमशिखरावर तिरंगा फडकवला.
इंडो तिबेटियन पोलीस दलाच्या दोन अधिकाऱ्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. कमांडंट रतन सिंह सोनल आणि दुसरे म्हणजे डेप्युटी कमांडंट अनूप कुमार यांचे नाव नित्य नव्या विक्रमांशी जोडले जाते. . रतन सिंह यांनी त्याच वर्षी माउंट ल्होत्से (जगातील ४ सर्वोच्च शिखर) वर देखील विजय मिळवला आहे .
मानसलूचं आव्हान
- मानसलू शिखर हे समुद्रसपाटीपासून ८१६३ मीटर २६७८१ फूट उंचीसह जगातील ८ सर्वोच्च शिखर आहे.
ज्या थंडीत शरीर गोठल्या लागते. - थंडीने हाडे वाजू लागतात.
- रक्त गोळा होते. जीभ सुन्न होते. त्या थंडीला आव्हान देत, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी नेपाळच्या मानसलू शिखरावर तिरंगा फडकवला आहे.
डेअरडेव्हिल्स ऑपरेशनचे केले होते नेतृत्व
या आयटीबीपी अधिकाऱ्यांनी कठीण नंदा देवीवरील डेअरडेव्हिल्स बचाव कार्याचे नेतृत्वही केले. जुलै २०१९ मध्ये या ऑपरेशनमध्ये चार परदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. रेस्क्यू पथकाने २० हजार फूट उंचीवरून ७ मृतदेहही बाहेर काढले.
अद्वितीय विक्रम
भारत-चीन सीमेचे रक्षण करणाऱ्या आयटीबीपी टीमच्या नावावर गिर्यारोहणात अनेक विक्रमांची नोंद आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या टीमने एव्हरेस्टसह २२० पेक्षा जास्त पर्वतारोहण मोहिमा पूर्ण केल्या आहेत. हे स्वतः एक रेकॉर्ड आहे. यासाठी संपूर्ण टीमला सात पद्मश्री आणि १४ तेनझिंग नॉर्गे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.