मुक्तपीठ टीम
राज्यातील आघाडी सरकारवर तुटून पडलेले भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी सातारा आणि बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी अजित पवारांवर कुटुंबियांवर हल्लाबोल करत आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यांच्या दौऱ्याला २४ तास उलटत नाहीत तोच गुरुवारी आयकर विभागाकडून पुणे आणि सातारा जिल्ह्यात धाडी घातल्या आहेत. आयकरच्या धाडींचे लक्ष्य अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे दिसून येत आहे.
पुणे मोदीबाग
- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील मोदी बाग या सोसायटीत राहतात.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील याही त्याच सोसायटीत राहतात.
- या सोसायटीतही आयकर विभागाचं धाडसत्र सुरु असल्याची बातमी सकाळी आली.
पुणे पंचवटी भाग
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांच्या निवासस्थानी आयकर खात्याची धाड सुरु आहे.
- पुण्यातील पंचवटी भागात इंदुलकर यांचे निवासस्थान आहे.
- सकाळपासून इंदुलकर यांच्या घरात आयकर तपासणी सुरु आहे.
बारामतीच्या डायनॅमिक्स कंपनीत शोध
- पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीच्या डायनॅमिक्स कंपनीत आयकर खात्याची चौकशी सुरू आहे.
- आयकर पथक कागदपत्रांची कसून तपासणी करत आहे.
आठ तासांपासून छाननी
- अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखान्यावरही धाड मारण्यात आली आहे.
- पहाटे सहा वाजताच या अधिकाऱ्यांनी कारखान्यावर येऊन धाड घातली.
- कारखान्यातील महत्वाच्या फाइल, कागदपत्रांची तपासणी केली.
- ही तपासणी दहा तासांपासून सुरु आहे.
सातारच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरही धाड
- सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावरही आयकर विभागाची तपासणी सुरु आहे.
- जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे.
- किरीट सोमय्यांनी हा साखर कारखाना सहकारीचा खासगी केल्यानंतरची खासगी कंपनी ही अजित पवारांशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे.
अजित पवारांच्या वर्तुळातील साखर कारखान्यांवर आयकर धाडी
- पुणे – दौंड शुगर्स
- अहमदनगर – आंबालिका शुगर्स
- सातारा – जरंडेश्वर साखर कारखाना
- नंदुरबार – पुष्पदनतेश्वर शुगर
- या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे.
“अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक सांगावा”!
- किरीट सोमय्या यांचे अजित पवारांना थेट आव्हान
- सोमय्या यांनी अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
- जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण?
- अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे
- आता साखत कडू वाटायला लागली का?
- कारखाने लुटताना काही वाटलं नाही का?
- अजित पवारांनी राऊतांकडून शिकावं. बेनामी कारभार कोर्टात सांगा. मग कोणी धाड घालणार नाही
- ठाकरे-पावर घोटाळेबाज सरकार, घोटाळेबाजांवर कारवाई होणारच