मुक्तपीठ टीम
अत्तर व्यापारी पियूष जैनच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकून २५० कोटींची रोकड जप्त केली. मात्र कोट्यवधींची रोकड घरात ठेवणाऱ्या पियूष जैनचं राहणीमान अगदी साधं आहे. अजूनही तो कन्नौजमध्ये आपल्या जुन्या स्कूटरनेच फिरायचा. त्याच्या घराबाहेर २ चारचाकी, त्यातली एक क्वॉलीस आणि दुसरी मारुती गाडी उभी असायची.
पियूष जैनजैनला कर चोरीच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत जैनच्या घर आणि कारखान्यातून १९४ कोटी रोख रक्कम आणि २३ किलो सोनं सापडलं आहे. त्याच्या घरात रोख रक्कम सापडल्यानंतर पैशाच्या मोजणीसाठी मशिन्सचा वापर करण्यात आला.
तसंच घरात जमिनीखाली पाण्याच्या टाकीसारखी जागा बनवून त्यात तेलाच्या बॅरेलखाली पैसा ठेवण्यात आला होता. तसंच हे बॅरेल हटवल्यानंतर एक तिजोरी होती. त्यातून सोनं, चांदी जप्त करण्यात आलं. पैशाची मोजदाद पूर्ण झाल्यानंतर हा पैसा नेण्यासाठी अधिकाऱ्यांना कंटेनर मागवावे लागले.
कोण आहे पियूष जैन?
- पियूष जैनने अत्तर बनवण्याची कला वडीलांकडून शिकली.
- व्यवसायाने तो केमिस्ट होता.
- त्याने कानपूरमध्ये अत्तरचा व्यवसाय सुरु केला.
- १५ वर्षात त्याच्या व्यवसायाचा देशाच्या विविध भागात विस्तार झाला.
- मुंबई आणि गुजरातमध्ये त्याच्या व्यवसायाने जोर पकडला आहे.
- पियूष जैनला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
- चौकशीसाठी त्याला अहमदाबादमध्येही नेलं जाऊ शकतं.