मुक्तपीठ टीम
ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल या समस्या आता जगभर गंभीर समस्या मानल्या जात आहेत. हरित उर्जेकडे वळण्याची गरज वाढत असली तरी, बदल तेवढ्या वेगाने होत नाही. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्त्रोने जगभरात सौरऊर्जा निर्मिती केंद्रांच्या स्थापनेसाठी सर्वात योग्य ठिकाणे ओळखण्याची पद्धत तयार केली आहे. पृथ्वी निरीक्षण उपग्रहांकडून मिळालेल्या डेटाचा वापर करून इस्रोने सोलर कॅल्क्युलेटर अॅप तयार केलंय.
सध्या जग हे सौरऊर्जेकडे जास्तीत जास्त वळण्याचा प्रयत्न करतेय. पण त्यासाठी सर्वात जास्त योग्य ठिकाण कोणतं ते ठरवणं सोपं नसतं. इस्त्रोनं तयार केलेलं सोलार कॅल्क्युलेटर अॅप विविध प्रदेशांमध्ये सोलर पॅनेल स्थापित करण्यासाठी तेथे असलेल्या फायद्यांची गणना करू शकते. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी फोटोव्होल्टेइक सोलर पॅनेल स्थापित करण्यासाठी त्याचा फायदा होईल. सोलर कॅल्क्युलेटर हे वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड या उपक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे. सोलर कॅल्क्युलेटर जगभरातील सौर उर्जा ग्रीडमार्फत सर्वत्र, सर्व वेळ स्वच्छ ऊर्जा सुनिश्चित करू शकते.”
इस्रोच्या सौर कॅल्क्युलेटरमुळे वन सन, वन वर्ल्ड वन ग्रीड उपक्रमाला मिळणार बळ
- ग्लासगो येथे COP26 ग्लोबल क्लायमेट समिटमध्ये, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की इस्रो जगाला सोलर पॉवर कॅल्क्युलेटर भेट देत आहे.
- या शोधामुळे वन सन, वन वर्ल्ड वन ग्रीड उपक्रमाला बळ मिळेल.
- सोलर कॅल्क्युलेटर हा एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रस्ताव होता जो पृथ्वी निरीक्षण उपग्रहांकडील डेटा वापरून तयार करण्यात आला आहे.
- जगभरात उपग्रह डेटा वापरणे आणि संभाव्य क्षेत्रे ओळखणे ज्यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त सौर ऊर्जा उपलब्ध आहे.
- इस्रो हा डेटा गोळा करणार आहे, त्याचे विश्लेषण करणार आहे, त्याचे मॅपिंग करणार आहे आणि तो ऑनलाइन आणि मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे शेअर करणार आहे.
- या डेटाचे मॅपिंग करणे आणि ते सामायिक करणे देशांना त्यांचे आगामी सौर ऊर्जा प्रकल्प ठरवण्यास मदत करेल.
सौरऊर्जेसाठी सोलर कॅल्क्युलेटर चांगलेच उपयोगी ठरेल
- इस्रो फक्त डेटा वापरत, मॅपिंग आणि विश्लेषण करत आहे.
- या प्रकल्पासाठी ते कोणत्याही हार्डवेअरवर काम करत नाही.
- अहमदाबादच्या स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरने सौरऊर्जेच्या संभाव्यतेच्या गणनेसाठी अँड्रॉइड अॅप्लिकेशन विकसित केले आहे.
- सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी पीव्ही सौर पॅनेलच्या स्थापनेसाठी हे एक अतिशय उपयुक्त साधन असेल.
- मोबाइल अॅप युजर्सना किलोवॅट/चौरस मीटर मध्ये सौरऊर्जेच्या संभाव्यतेशी संबंधित सर्व डेटा प्राप्त करण्यास अनुमती देईल.
- हे भारतीय भूस्थिर उपग्रह डेटा वापरून प्रक्रिया केलेले मासिक आणि वार्षिक सौर क्षमता प्रदान करते.
- वास्तविक सौर क्षमतेची गणना करण्यासाठी ते मासिक कमाल आणि किमान तापमान देखील प्रदान करेल.
- इस्रोने पवन, सौर आणि लहरी ऊर्जा संसाधने देखील जोडली आहेत.
- पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या वरच्या भूस्थिर कक्षेत असलेल्या उपग्रहांमधून मिळालेल्या पृथ्वी निरीक्षण डेटाच्या मदतीने याचे मूल्यांकन केले जाऊ शकते.