Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संप फोडण्यासाठी प्रयत्न! पोलीस संरक्षण आणि निलंबन!!

एसटी कर्मचारी कामावर परतत असल्याचा महामंडळाचा दावा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
st strike (2)

मुक्तपीठ टीम

राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या १४ दिवसांपासून संप पुकारला आहे. संपामुळे सामान्य प्रवाशांना त्रास होत असल्याने एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचे प्रयत्न जोरात सुरु असल्याची चर्चा आहे.

 

एसटी कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन महामंडळाने दिले आहे. एकीकडे संपावरून कामावर परतण्यासाठी पोलीस संरक्षणाचे आश्वासन तर दुसरीकडे निलंबनाच्या कारवाईचा वेग वाढवत रोजगाराचं संरक्षण काढून घेण्याचं दबावतंत्रही एसटी प्रशासन वापरत आहे. गुरुवारी १,१३५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आतापर्यंत निलंबनाची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५३ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे संप फोडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे मानले जाते.

 

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाची तीव्रता वाढतीच!

  • संपकरी एसटी कर्मचाऱ्यची राज्यात विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत.
  • काही आगारांच्या प्रवेशद्वारांवरच कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत.
  • काही आगारांना पोलिसांच्या छावणीचेही स्वरुप आले आहे.
  • आझाद मैदानातही मोठ्या प्रमाणात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून निदर्शने होत आहेत.
  • यात विलीनीकरणाची मागणी घेऊन काही कर्मचारी हाती फलक घेऊन उभे आहेत.

 

संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्न

  • संपाची तीव्रता पाहता एसटी महामंडळाने संप मोडीत काढण्यासाठी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली आहे.
  • यानंतर राज्यातील संपकरी एसटीचे कर्मचारी पुन्हा रुजू होणारअसल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
  • कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा
  • संपामुळे गुरुवारीही राज्यातील विविध आगार बंदच राहिले.
  • त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचे भाडे आकारून आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडण्यात आल्या.

 

कामावर परतणाऱ्यांना पोलीस संरक्षण

  • परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी बुधवारी राज्यातील एसटीचे विभाग नियंत्रक, आगार प्रमुख आणि एसटीचे अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होण्यास तयार असल्याची माहिती दिली.
  • अशा कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यावर संरक्षण देण्यात येईल.
  • यासाठी पोलिस महासंचालकांशीही चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले.
  • एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे व सेवा पूर्ववत व्हावी यासाठी विशेष अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

गुरुवारी केले १,१३५ कर्मचाऱ्यांना निलंबित, दोन हजारावर निलंबित!

  • गुरुवारी १,१३५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आतापर्यंत निलंबनाची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५३ पर्यंत पोहोचली आहे.
  • गुरुवारी पुणे विभागातील सर्वाधिक १३८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
  • तर जळगाव विभागातील ९१, ठाणे विभागातील ७३, बीड विभागातील ६७, मुंबई विभागातील ६४ व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Tags: Anil ParabST CorporationST Strikestate govtअनिल परबएसटी कर्मचारीएसटी महामंडळराज्य सरकार
Previous Post

लोकशाहीच्या विजयाचे प्रतिक ऐतिहासिक नामांतर आंदोलन- जोगेंद्र कवाडे

Next Post

प्रभाकर साईलचे आणखी काही गौप्यस्फोट….प्रकरणातील गूढ आणखीच वाढू लागले!

Next Post
prabhakar sail alligation

प्रभाकर साईलचे आणखी काही गौप्यस्फोट....प्रकरणातील गूढ आणखीच वाढू लागले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!