मुक्तपीठ टीम
विदेशात फिरण्याची प्रत्येकाला एक वेगळीच इच्छा असते. स्वित्झर्लंडसारखे बर्फाच्छादित ठिकाण म्हणजे सर्वांच्याच स्वप्नापलिकचे ठिकाण. जाण्या-येण्यासाठी येणारा लागणारा भरगोस खर्च त्यामुळे अनेकांना येथे भेट देता येत नाही. पण आता याची कसलीच चिंता राहणार नाही. कारण अगदी स्वस्त खर्चात आणि भारतातच मिनि स्वित्झर्लंडला भेट देता येणार आहे. लखनऊ ते अमृतसर, डलहौसी आणि धर्मशाळा असा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एक उत्तम संधी आहे. कारण, आयआरसीटीसी एक उत्तम पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजद्वारे अमृतसर, डलहौसी आणि धर्मशाळेला जाता येणार आहे. या टूर पॅकेजमध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि डलहौसीमधील भव्य हिल स्टेशन्स आणि धर्मशाळा यांचा आनंद घेता येईल.
हे टूर पॅकेज ६ रात्र आणि ७ दिवसांच्या कालावधीसाठी आहे. पहिल्या दिवसाचा प्रवास अमृतसरपासून सुरू होतो. अमृतसरमध्ये, हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम केला जाईल, जिथे तुम्ही त्याच दिवशी वाघा बॉर्डरवर भारत-पाक सीमा परेड सोहळा पाहण्यास मिळेल. आयआरसीटीसी या टूर पॅकेजमध्ये, ये-जा करण्यासाठी फ्लाइट तिकीट मिळेल. त्याठिकाणी फिरण्यासाठी बसेस आणि राहण्यासाठी हॉटेल आणि जेवण दिले जाईल. याशिवाय या टूर पॅकेजमध्ये गाइड आणि इंशोरन्स मिळतो.
प्रवासाबाबत संपूर्ण वेळापत्रक
- दुसऱ्या दिवशी तुम्ही अमृतसरहून डलहौसीला पोहोचाल.
- त्याच दुसऱ्या दिवशी, डलहौसीहून चंबाला पोहोचाल, जिथे तुम्हाला खज्जियारला भेट देण्याची संधी मिळेल. ज्याला भारताचे मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात.
- यानंतर प्रवास डलहौसी ते धर्मशाला असा होईल.
- धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम मिळेल.
- पाचव्या दिवशी कांगडा मार्गे धर्मशाळेतून चामुंडा-ज्वाला जी येथे पोहोचाल.
- त्याच वेळी, ६व्या दिवशी धर्मशाळेतून चक्की बँक अमृतसरला पोहोचाल. यानंतर, ७व्या दिवशी अमृतसर हॉटेलमधून फ्लाइटने लखनऊला पोहोचाल.
टूर पॅकेजची किंमत आणि बुक कसे करावे
टूर पॅकेजची किंमत ३४ हजार रुपयांपासून सुरू होते, जी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://www.irctctourism.com वरून देखील बुक करू शकता.
या सुविधाही मिळणार
- या टूर पॅकेजमध्ये लखनौ ते अमृतसर आणि अमृतसर ते लखनौ फ्लाइट तिकीट मिळेल.
- त्याचबरोबर अमृतसरमध्ये २ रात्र घालवण्याची संधी मिळेल.
- याशिवाय धर्मशाळेत २ दिवस आणि डलहौसीमध्ये २ दिवसांचा मुक्काम मिळेल. या ६ दिवसात तुम्हाला नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. तुम्हाला साईड-सीन प्रवासासाठी शेअरिंग आधारावर १६ सीटर एसी वाहन मिळेल. याशिवाय तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि टूर मॅनेजर देखील मिळेल.