मुक्तपीठ टीम
IRCTC ने भगवान बुद्धांच्या जीवनात महत्वाचे स्थान असणाऱ्या शहरांना भेट देण्यासाठी नवीन टूर पॅकेज आणले आहे. हे पवित्र पर्यटनाचं टूर पॅकेज आठ दिवस आणि सात रात्रीचे आहे. IRCTC ने याला ‘स्पिरिच्युअल जर्नी ऑफ बुद्ध’ असे नाव दिले आहे. ट्रेन टूरचे हे पॅकेज ७ हजार ५६० रुपये प्रति प्रवाशी खर्चापासून सुरू होत आहे.
‘स्पिरिच्युअल जर्नी ऑफ बुद्ध’ ट्रेन बोधगया, सारनाथ, लुंबिनी आणि कुशीनगर या भगवान बुद्धांच्या सर्व महत्त्वाच्या शहरांचं दर्शन घडवेल. अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा, नागपूर, बैतूल आणि इटारसी ही स्थानके जिथे ट्रेन थांबेल म्हणजेच प्रवासी चढू किंवा उतरू शकतील. या ट्रेनला भारत दर्शन टुरिस्ट ट्रेन असे संबोधण्यात येईल. या टूरमध्ये प्रवाशांना ट्रेन, बस, जेवण, गाईड किंवा एस्कॉर्ट आणि विमा सुविधा मिळतील.
IRCTC टूर पॅकेजचा कोड WZBD312 असा ठेवण्यात आला आहे. ही ट्रेन महाराष्ट्रातील अकोला येथून स्लीपर आणि ३-टायर एसी कोचने धावणार आहे. २३ जानेवारी २०२२पासून सुरू होणारी ही ट्रेन ३०जानेवारीपर्यंत आपला प्रवास पूर्ण करेल. IRCTC च्या म्हणण्यानुसार, त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. हे पवित्र अध्यात्मिक पर्यटन करण्यास इच्छुक असलेले ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात.
कसं असणार बुद्ध जीवनातील शहरांचं अध्यात्मिक पवित्र पर्यटन?
- तिकिटाच्या किंमतीत नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे.
- पॅकेजमध्ये दोन प्रकारची तिकिटे ठेवण्यात आली आहेत.
- दोघांचे भाडे वेगळे आहे. मानक पॅकेज ७ हजार ५६० रुपये आहे आणि आराम पॅकेज ९ हजार २४० रुपये आहे.
- सोप्या भाषेत स्लीपरसाठी ७ हजार ५६० रुपये आणि एसी ३-टियरसाठी ९ हजार २४० रुपयांचे पॅकेज आहे.
- जर एखादे मुल कुटुंबासह एकत्र जात असेल आणि त्याचे वय पाच वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचे भाडे आकारले जाणार नाही.
- परंतु पाच वर्षांवरील बालकाचे संपूर्ण भाडे भरावे लागेल.
‘स्पिरिच्युअल जर्नी ऑफ बुद्ध’ ट्रेन प्रवास नेमका कसा?
- ही ट्रेन २३ जानेवारी २०२२ रोजी अकोला येथून सुरू होईल.
- त्यानंतर प्रवाशांना बडनेरा, धामणगाव, वर्धा, नागपूर, बैतूल, इटारसी येथे चढवण्यात येणार आहे.
- ही ट्रेन २४ जानेवारीला गयाला पोहोचेल.
- येथून प्रवाशांना रस्त्याने बोधगया येथे नेले जाईल.
- येथे प्रवासी महाबोधी मंदिर आणि निरंजना नदीला भेट देऊ शकतील.
- येथे थाई मंदिर, जपानी मंदिर, बुद्ध मूर्ती पाहण्याची संधी मिळेल. रात्रभर प्रवाशांना येथेच थांबावे लागणार आहे.
‘स्पिरिच्युअल जर्नी ऑफ बुद्ध’ ट्रेन पुढचा प्रवास कसा असणार?
• दुसऱ्या दिवशी २५ जानेवारीला प्रवाशांचा नाश्ता झाल्यावर बस राजगीरला रवाना होईल.
• बिंबिसारा कारागृह, ग्रद्धकूट टेकडी आणि वेणुवन येथे फेरफटका मारला जाईल. यानंतर नालंदाला जाईल, जेथे प्रसिद्ध नालंदा विद्यापीठ आणि नालंदा संग्रहालयाला भेट दिली जाईल.
• नालंदानंतर प्रवाशांना बसने गया येथे आणले जाईल.
• जेथे ते ट्रेनमध्ये बसतील आणि पुढील प्रवासासाठी रवाना होतील.
• गया स्टेशनवरून ट्रेन वाराणसीला रवाना होईल.
• २६ जानेवारीला ट्रेन वाराणसीला पोहोचेल, तिथे फ्रेश झाल्यावर प्रवासी सारनाथला रवाना होतील. सारनाथला भेट दिल्यानंतर प्रवासी नौतनवाकडे रवाना होतील.
बदल्यात या स्थानकांवर थांबा
• नौतनवा येथून प्रवासी रस्त्याने लुंबिनी, नेपाळ येथे जातील.
• येथे दुपारच्या जेवणानंतर आपण गौतम बुद्धांच्या जन्मस्थानाला भेट दिली जाईल.
• इतर बौद्ध मंदिरांना भेटी दिल्या जातील आणि लुंबिनीमध्ये रात्रभर राहण्याची सोय उपलब्ध आहे.
• येथून २८ रोजी सकाळी कुशीनगरसाठी प्रवास सुरू होईल.
• येथेच भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले.
• येथे फिरल्यानंतर प्रवाशांना बसने गोरखपूरला नेले जाईल जिथे ट्रेन थांबेल.
• २९ रोजी गोरखपूर येथून परतण्यासाठी गाडी सुटेल.
• २९ जानेवारीला वर्धा, धामनगर, बडनेरा आणि शेवटी ३० जानेवारीला इटारसी, बैतूल, नागपूर मार्गे अकोला स्थानकात पोहोचेल.
• भारत दर्शन ट्रेनचा प्रवास इथेच संपणार आहे.