मुक्तपीठ टीम
या वेळी हिवाळ्याच्या मोसमात, जर तुम्हाला मस्त हिमवर्षावाचा आनंद लुटायचा असेल तर तुम्हाला उत्तर भारतातील हिमालयाच्या सान्निध्यात जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीने आणलेली एक भन्नाट ऑफर उपयोगी पडेल. तुम्ही आयआरसीटीसीच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. सुंदर बर्फाळ पर्वतांचा आनंद घेण्यासाठी हिमाचल प्रदेशात अनेक उत्तम पर्यटन स्थळं आहेत. हिमाचलची राजधानी असलेल्या शिमला आणि मनालीला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. हिवाळ्यातील हिमवर्षावानंतर शिमला आणि मनालीचे दृश्य वेगळे असते, या दोन ठिकाणांना भेट देण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी एक उत्तम हवाई टूर पॅकेज देत आहे.
हवाई टूर पॅकेजमध्ये चंदीगडलाही भेट देण्याची संधी
- आयआरसीटीसी टूर पॅकेजचे वैशिष्ट्य म्हणजे यात कुल्लू-मनाली आणि शिमला तसेच चंदीगडला जाण्याची संधी मिळणार आहे.
- हे टूर पॅकेज कोची विमानतळावरून सुरू होईल.
- पर्यटक कोची विमानतळावरून चंदीगडला जातील.
- चंदीगडला पोहोचल्यानंतर प्रवासी रस्त्याने शिमलासाठी रवाना होतील.
- शिमल्यात पोहोचल्यानंतर, प्रवासी रात्रीची विश्रांती आणि रात्रीचे जेवण थेट हॉटेलमध्ये घेतील.
- दुस-या दिवशी न्याहारीनंतर पर्यटक शिमल्याजवळील कुफरी या हिल स्टेशनला रवाना होतील.
- संध्याकाळी, प्रवासी कुफरीला भेट देऊन मॉल रोड शिमला येथे परततील.
हवाई टूरद्वारे हिडिंबा देवीच्या दर्शनाचीही सोय
- दुसऱ्या दिवशी न्याहारी झाल्यानंतर प्रवासी मनालीला रवाना होतील.
- मनालीला जाताना प्रवासी कुल्लूलाही भेट देतील.
- मनालीला पोहोचल्यानंतर पर्यटक हॉटेलमध्ये चेक इन करतील. ४. हॉटेलमध्ये रात्री विश्रांती घेतल्यानंतर, प्रवासी दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून मनालीला रवाना होतील.
- मनालीमध्ये, प्रवासी हिडिंबा मंदिर, मनु मंदिर, वशिष्ठ मंदिर स्नान, वन विहार, तिबेटी मठ आणि क्लब हाऊस सारख्या ठिकाणी भेट देतील.
- दुसऱ्या दिवशी प्रवासी रोहतांग पास आणि अटल बोगद्याकडे रवाना होतील.
- प्रवासी रोहतांग पास मार्गे मनालीला परतताना सोलांग व्हॅलीला जातील. दुसऱ्या दिवशी प्रवासी मनालीहून चंदीगडला रवाना होतील.
कमी किंमतीचे असणार पॅकेज
चंदीगडला पोहोचल्यावर, हॉटेलमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर प्रवासी दुसऱ्या दिवशी चंदीगडमधील रॉक गार्डन आणि पार्टीशन म्युझियमला भेट देतील. दुपारी, प्रवासी चंदीगड विमानतळावरून कोचीला परत जातील. मनाली आणि शिमला या ६ रात्र आणि ७ दिवसांच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला ३४,९९५ रुपये खर्च करावे लागतील.