मुक्तपीठ टीम
आयआरसीटीसीने जाहीर केलेली ऑफर महिला प्रवाशांसाठी रक्षाबंधन भेट आहे. २४ ऑगस्टपर्यंत ‘तेजस एक्सप्रेस’ च्या दोन प्रीमियम गाड्यांमध्ये सर्व महिला प्रवाशांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रवासासाठी तिकिटांमध्ये विशेष सवलत दिली जाईल. महिलांसाठी ५ टक्के विशेष कॅशबॅक ऑफर सुरू करण्यात आली आहे. कॅशबॅक ऑफर केवळ दिलेल्या कालावधीत केलेल्या प्रवासासाठी लागू होईल.
IRCTC चे रक्षाबंधन गिफ्ट
- महिलांना रक्षाबंधनच्या मुहूर्तावर ट्रेनच्या तिकीटावर सुट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- इंडियन रेल्वे कॅटरिंग एंड टूरिज्म कॉरपोरेशन (IRCTC) ने रक्षाबंधन या भाऊ आणि बहिणीच्या सणाला महिलांसाठी विशेष कॅशबॅक ऑफर (IRCTC Cash Back Offer) सुरु केली आहे.
- ही ऑफर १५ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या कालावधी साठी असणार आहे. या कालावधी मध्ये महिलांना ५% सुट मिळणार आहे.
- या कालावधीत महिला जितक्या वेळा रेल्वेने प्रवास करतील तितक्या वेळा त्यांना कैशबॅक मिळेल.
- तेजस एक्सप्रेसच्या दोन प्रीमियम ट्रेन मधुन प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आणि या विशिष्ट कालावधीसाठी ही ऑफर आहे.
- कोरोना नियमांचे पालन करने सर्वांना बंधनकारक असेल.
आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत महिला जितक्या वेळा प्रवास करतील तितक्या वेळेस कॅशबॅक ऑफरने तिकीटात सूट दिली जाईल. यासह, ज्या खात्यातून तिकीट बुक केले गेले आहे, त्याच खात्यात कॅशबॅकचे पैसे जमा होतील. ही कॅशबॅक ऑफर त्या महिला प्रवाशांना देखील लागू होईल ज्यांनी ऑफर सुरू होण्यापूर्वी या प्रवासाच्या कालावधीसाठी तिकीट आधीच बुक केली आहे किंवा मिळवली आहे.
भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने म्हटले आहे की, रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला प्रवाशांसाठी सुरु केलेली विशेष कॅशबॅक ऑफर लखनऊ-दिल्ली आणि अहमदाबाद – मुंबई या मार्गांवरील तेजस एक्सप्रेस साठी लागु असेल. आयआरसीटीसी येत्या सणांमध्ये प्रीमियम गाड्यांच्या प्रवाशांसाठी अधिक आकर्षक प्रवासाची ऑफर आणण्याची योजना आखत आहे.
कोरोना नियमांचे पालन आवश्यक
- लखनौ-दिल्ली-लखनौ (ट्रेन क्र. ८२५०२/०२) तेजस एक्सप्रेस आणि अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस (ट्रेन क्र. ८२९०१/०२) मार्गावर धावत आहे.
- सर्व प्रवाशांच्या आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलच्या अनुषंगाने रेल्वेने ७ ऑगस्टपासून दोन प्रीमियम पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या पुन्हा सुरू केल्या आहेत.
- सध्या, लखनौ-दिल्ली-लखनौ आणि अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आठवड्यातून ४ दिवस (शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार) कार्यरत आहेत.