मुक्तपीठ टीम
वीवोचा सब ब्रँड आयक्यूओओ हाही आता भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी भारतात एका पाठोपाठ एक नवीन स्मार्टफोनची मॉडेल लॉन्च करत आहे. आता आयक्यूओओ ८ सीरीज लॉन्च करण्यात आला आहे. त्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जबरदस्त कॅमेरे आहेत. आयक्यूओओ ८ प्रो स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, ४८ मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि १६ मेगापिक्सलचा मिड-फोकस लेन्स ही १४ एमएम, ६०एमएम फोकल लेंथ सोबत असेल.
आयक्यूओओ ८ स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
आयक्यूओओ ८ सिरीजच्या लाइनअप मध्ये तीन डिवाइस आयक्यूओओ ८, आयक्यूओओ ८ प्रो, आयक्यूओओ ८ बीएमडब्ल्यू एडिशन समावेश शक्यता आहे.
जबरदस्त कॅमेरा
आयक्यूओओ ८ प्रो स्मार्टफोन मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, ४८मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि १६-मेगापिक्सलचा मिड-फोकस लेन्स १४ एमएम-६०एमएम फोकल लेंथ सोबत असेल.
मनमोहक आकर्षक डिजाइन
आयक्यूओओ ८ मध्ये रियर वर ग्लास मेटल फिनिश असू शकते. या व्यतिरिक्त स्मार्टफोन एक रेक्टंगुलर कॅमेरा मॉड्यूलला स्पोर्ट करेल ज्यात आयक्यूओओ ब्रांडिंग स्मार्टफोनच्या खाली असेल. चाइनाजॉय इव्हेंटमध्ये आयक्यूओओ ८ ला सुद्धा शोकेस केले होते.
डिवाइसच्या उजव्या बाजूला एक वेगळ्या रंगाचे पॉवर बटन आणि वॉल्यूम रॉकर आहे. खालील बाजूला यात स्पीकर ग्रिल, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि एक सिम-ट्रे आहे. सोबतच या डिवाइस मध्ये कोणते हेडफोन जॅक नाही.