Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॅशिंग आयपीएस शिवदीप लांडेंच्या ‘वूमन बिहाइंड द लायन’ आत्मचरित्रात गौप्यस्फोट: “बालपणी करायचा होता वडिलांचा खून!”

October 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
IPS Shivdeep Lande

रोहिणी ठोंबरे

यूपीएससी क्रॅक करणाऱ्यांच्या संघर्षाचे किस्से आपण ऐकत असतो. कौटुंबिक गरिबी, कठीण परिस्थितीवर मात करून ते यश मिळवतात हे जाणून घेतल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते. असाच एक आयपीएस अधिकारी म्हणजे शिवदीप वामनराव लांडे, ज्यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्पा पाहिला. आयपीएस शिवदीप वामनराव लांडे हे सध्या बिहारच्या कोसी रेंजचे नवीन डीआयजी आहेत. मध्यंतरी त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रात झाली, जिथे त्यांनी ड्रग माफियांना चांगलाच धडा शिकवला.

शिवदीप वामनराव लांडेंना, कडक आयपीएस, सिंघम, सुपरकॉप, गुन्ह्यांचा शत्रू या आणि अशा अनेक नावांनी ओळखले जाते. नुकतेच आयपीएस लांडे यांच्या ‘वुमन बिहाइंड द लायन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी लांडे म्हणाले की, “या पुस्तकात एका मुलाचा उल्लेख आहे, ज्याला लहानपणी वडिलांना मारून घरातून पळून जावे, असे वाटायचे. आज तो आयपीएस अधिकारी आहे.” यामुळे सर्वांना यामागचे कारण काय आहे हे जाणून घ्यायची आतुरता आहे.

कडक रूबाबामागे हळव्या मनाचा दडलेला लेखक!

  • आयपीएसच्या कठोर चेहऱ्यामागे एक हळव्या मनाचा लेखकही दडलेला आहे.
  • एकेकाळी पत्नी ममता साठी वन टू वन लिहिणार्‍या लेखकाने मुलगी आराहासाठी कविता लिहिल्या.
  • आता शिवदीप लांडे यांनी संपूर्ण पुस्तक लिहिलं आहे… वुमन बिहाइंड द लायन.
  • या पुस्तकात स्वत: लांडे यांनी कबूल केले आहे की, त्यांना एकदा वडिलांचा खून करायचा होता.

एकेकाळी शिवदीप लांडेंना वडिलांचा खून करायचा होता…

  • शिवदीप वामनराव लांडे यांनी स्वतःच्या आयुष्याशी संबंधित हा मोठा खुलासा केला आहे.
  • पटना येथे वूमन बिहाइंड द लायन या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी लांडे यांनी ही माहिती दिली.
  • माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांनी वडिलांना मारण्याचा विचारही केला होता. असे ते म्हणाले.
  • शिवदीप लांडे त्यांचे पूर्ण नाव शिवदीप वामनराव लांडे असे लिहितात.
  • त्यांच्या म्हणण्यानुसार लहानपणी त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती. घरच्यांची अशी अवस्था बघून त्यांना अनेकदा राग यायचा.
  • त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते पण ते अंमली पदार्थांच्या आहारी गेले होते. त्यांना पाहून लांडे यांना राग यायचा. याच कारणामुळे घरची आर्थिक परिस्थितीही बिकट होती, जी वडिलांची नोकरी गेल्यानंतर बिघडली.
  • अशा परिस्थितीत लांडे यांच्या आईने मुलांसह संपूर्ण घर त्यांनी सांभाळले. आईकडून प्रेरणा घेऊन शिवदीप लांडे यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
  • परंतु ते आयपीएस झाले आणि हे पुस्तक त्यांनी त्यांच्या आईला अर्पण केले आहे.

आईने केलेल्या संघर्षावर पुस्तक अर्पण!

  • पुस्तकात त्यांनी आईचे समर्पण आणि संघर्षही नमूद केला आहे.
  • आयपीएस अधिकारी लांडे यांनी सांगितले की, मी गरिबीत वाढलो आणि कठोर संघर्षांवर मात करून या पदावर पोहोचलो.
  • यासाठी त्यांच्या आईने अथक परिश्रम घेतले आहेत.

Tags: bihargood newsinspirationIPS Shivdeep LandemuktpeethWoman Behind The Lion Autobiographyआयपीएस शिवदीप लांडेघडलं-बिघडलंचांगली बातमीप्रेरणाबिहारमुक्तपीठवूमन बिहाइंड द लायन आत्मचरित्र
Previous Post

गुजरात विधानसभा निवडणूक: दलित मतांचं नेमकं समीकरण काय?

Next Post

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं! ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू…

Next Post
Kedarnath

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं! ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!