मुक्तपीठ टीम
आयपीएल २०२२ संपल्यानंतर, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढील वर्षीच्या आयपीएल तयारीला लागली आहे. येत्या १२ जून रोजी आयपीएलशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. रविवारी आयपीएल मीडिया राइट्सचा लिलाव होणार आहे. या लिलावातून बीसीसीआयला ६० हजार कोटी रुपयांची कमाई होणार असल्याची चर्चा आहे.
बीसीसीआयला मिळणार ६० हजार कोटी!
- २०२३ ते २०२८ या कालवधीसाठी एकूण चार भागांमध्ये आयपीएलचे माध्यम हक्क विकले जाणार आहेत.
- अशा प्रकारची विक्री पहिल्यांदाच होत आहे.
- यापूर्वी सर्व हक्क एकत्रितपणे विकले जात होते.
- टीव्हीपासून ते डिजिटल अधिकारही त्यात होते.
- डिजिटल मीडियाच्या वाढीमुळे बीसीसीआयने यावेळी एकाच पॅकेजऐवजी चार वेगवेगळ्या पॅकेजमध्ये हे हक्क विकण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यासाठी ३२ हजार ८९० कोटी रुपये मूळ किंमत (बेस प्राइस) निश्चित करण्यात आली आहे.
- म्हणजे या रकमेपासून बोली लागण्यास सुरुवात होईल.
- ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बीसीसीआयला या लिलावातून ६० हजार कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.
कोणत्या कंपन्याना स्वारस्य?
- आयपीएलची लोकप्रियता बघता माध्यमांदेखील यातून भरपूर नफा मिळवण्याची संधी आहे.
- त्यामुळे सुमारे डझनभर कंपन्यांनी आयपीएल माध्यम हक्क निविदा घेतल्या आहेत.
- Disney Hotstar, Sony Network, Viacom18, Zee Entertainment यांसारख्या देशांतर्गत कंपन्यांशिवाय Amazon, Apple आणि Google सारख्या कंपन्याही या लिलाव प्रक्रियेमध्ये स्वारस्य दाखवताना दिसत आहेत.
लिलाव कसा होणार?
- बीसीसीआय इच्छुक पक्षांकडून कोणत्याही ऑफलाइन बोली स्वीकारणार नाही.
- आयपीएल मीडिया राइट्सचा लिलाव एम-जंक्शनद्वारे ई-लिलावाद्वारे केला जाईल.
- १२ जूनपासून ई-लिलाव सुरू होणार आहे. हे अनेक दिवस चालू शकते.
आयपीएल मीडिया राइट्सचा इतिहास:
- आयपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम २००८ मध्ये खेळवण्यात आला होता.
- त्यावेळी सोनी कंपनीने त्याच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले होते.
- २००८ ते २०१७ या कालावधीसाठी सोनीने बीसीसीआयला आठ हजार २०० कोटी रुपये मोजले होते.
- तेव्हा ऑनलाइन प्रक्षेपण नव्हते.
- यानंतर बीसीसीआयने २०१८ मध्ये पुन्हा माध्यम हक्कांची विक्री केली.
- यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने त्यांची खरेदी केली होती.
मीडिया राइट्स काय आहेत?
- जेव्हा एखादी संस्था एखाद्या विशिष्ट कंपनीला टीव्ही किंवा डिजिटल माध्यमावर विशिष्ट वेळेसाठी कार्यक्रम दाखवण्याची परवानगी देते, तेव्हा ती रक्कम निश्चित करते.
- त्याला निर्धारित वेळेपर्यंत कार्यक्रम दाखवण्याची परवानगी आहे.
- जसे- सुरुवातीला सोनी चॅनेलवर आयपीएल प्रसारित केले जात होते. २०१७ पासून ते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होत आहे.