मुक्तपीठ टीम
आयपीएलच्या २०२१ च्या १४ व्या हंगामासाठी १८ फेब्रुवारीला चेन्नईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावासाठी एकूण १११४ क्रिकेटपटूंनी नोंद केली होती. तर विविध देशांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू यांनी ही लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून २९२ खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे.
दोन कोटी किंमतीच्या यादीत कोण?
• हरभजन सिंग
• केदार जाधव
• स्टीव्ह स्मिथ
• ग्लेन मॅक्सवेल
• शाकीब अल हसन
• मोईन अली
• सॅम बिलिंग्स
• लियम प्लंकेट
• जेसन रॉय
• मार्क वूड
तसेच या लिलावात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर नोंद करण्यात आली आहे. अर्जुनला २० लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्यांमध्ये स्थान मिळाले आहे. तर दीड कोटी मूळ किंमत असणारे १२ तर १ कोटी मूळ किंमत असणारे ११ खेळाडूंचा या लिलावात समावेश आहे.
या लिलावामध्ये एकूण १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि आयसीसीशी संलग्न असलेल्या देशातील ३ असे एकूण २९२ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. चेन्नईमध्ये होणारी ही लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर एकाच दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या येत्या हंगामात कोणता खेळाडू कोणत्या संघात जातो आणि त्यावर किती बोली लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.