Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयपीएलच्या लिलावात ‘या’ खेळाडूंवर बोली लागणे कठीण

February 18, 2021
in featured, मस्तच
0
ipl

मुक्तपीठ टीम

 

चेन्नईमध्ये आज, १८ फेब्रुवारीला आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावामध्ये १६४ भारतीय आणि १२५ परदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. एप्रिलमध्ये होणारा या आयपीएल हंगामासाठी आठ संघात फक्त ६१ जागा शिल्लक आहेत. या शिल्लक जागांसाठी एकूण २९२ खेळाडूंना निवडण्यात आले आहे.

 

लिलावात सहभागी झालेल्या १० खेळाडूंनी त्यांची बेस्ट प्राइस २ कोटी इतकी ठेवली आहे. तर २२ खेळाडूनी १.५ कोटी तर ११ खेळांडूनी १ कोटी इतकी आपली बेस्ट प्राईस ठेवली आहे. मात्र, सदर लिलावात भारतातील पाच खेळाडूंनी निवड होणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे. कोण आहेत हे खेळाडू पाहूयात…

 

चेतेश्वर पुजारा

  • भारतीय कसोटी संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा आयपीएल २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता.
  • त्यानंतर आठही संघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
  • यावर्षी पुजाराने स्वत:ची बेस प्राइस ५० लाख इतकी ठेवली आहे.
  • पुजारा हा कसोटीपटू आहे. त्यामुळे यापूर्वी कोणताही संघाने त्याच्यावर बोली लावलेली नाही.
  • त्यामुळे यावर्षी देखील लिलावात पुजाराकडे दुर्लक्ष केल्याची शक्यता आहे.

 

उमेश यादव

  • उमेश यादव भारतीय संघातील जलद गोलंदाज आहे.
  • पण उमेश गेल्या काही सामन्यात सातत्याने विकेट मिळवण्यात अपयशी ठरतो आहे.
  • गेल्या वर्षाच्या हंगामात तो अपयशी ठरला होता. दोन सामन्यात फक्त दोन विकेट त्याला मिळवता आल्या.
  • यावर्षी लिलावात त्याने स्वत:ची बेस प्राइस १ कोटी इतकी ठेवली आहे.
  • या किंमतीत अनेक जलद गोलंदाज आहेत. इतक नव्हे तर उमेश मोठ्या कालावधीपासून मर्यादीत षटकांचे सामने खेळला नाही.
  • त्यामुळे लिलावात त्याची खरेदी होणे कठीण दिसते.

 

हरभजन सिंग

  • दोन कोटी बेस प्राइस असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये हरभजनचा देखील समावेश आहे.
  • काही कालावधीपासून हरभजन क्रिकेटपासून लांब आहे.
  • त्यामुळे त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता कमी दिसते आहे.

पियुष चावला

  • कोलकाता नाइट रायडर्सचा मुख्य फिरकीपटू असलेला पियुष चावला गेल्या वर्षी चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळला होता.
  • पियुषने सात सामन्यात ६ विकेट घेतल्या.
  • पियुषच्या खराब कामगिरीमुळे लिलावात चावलाची खरेदी होण्याची शक्यता कमीच दिसते आहे.

 

केदार जाधव

  • गेल्या हंगामात केदार जाधवची कामगिरी खराब झाली होती. ८ सामन्यात त्याने फक्त ६२ धावा केल्या होत्या.
  • २०१९ मध्ये देखील केदारने १४ सामन्यात फक्त १६२ धावा केल्या होत्या.
  • फक्त खराब फॉर्म नव्हे तर केदारची बेस प्राइस देखील त्याच्या विरुद्ध जाऊ शकते.
  • केदारने त्याची बेस्ट प्राइस २ कोटी इतकी ठेवली आहे.
  • केदारच्या कामगिरीवरून लिलावात त्याच्यावर बोली लावली जाईल असे वाटत नाही.

Tags: IPLआयपीएलउमेश जाधवकेदार जाधवचेन्नईलिलाव प्रक्रियाहरभजन सिंग
Previous Post

#अध्यात्म सात्विक आहार

Next Post

शेतकऱ्यांच्या देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनास सुरूवात

Next Post
farmer rail roko

शेतकऱ्यांच्या देशव्यापी 'रेल रोको' आंदोलनास सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!