मुक्तपीठ टीम
आयफोनने जीव वाचवला, ऐकूण जरा आश्चर्य वाटलं ना… हो हे खरं आहे. सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून आश्चर्य वाटेल. एका युक्रेनियन सैनिकाला त्याच्या आयफोन ११ प्रो ने बंदुकीच्या बुलेटपासून वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक युक्रेनियन सैनिक त्याच्या बॅकपॅकमधून आयफोन काढताना दिसत आहे. २०१९ च्या मॉडेल आयफोनने बुलेटप्रूफ जॅकेट म्हणून काम केले, ज्यामुळे सैनिकाचे प्राण वाचले.
हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, व्हिडीओला ३ हजाराहून अधिक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. तर एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, “अॅन अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे” म्हणजेच दिवसाला एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवतो.
हा व्हिडिओ अशा वेळी व्हायरल झाला आहे जेव्हा युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशियन सैन्याने युक्रेनच्या दक्षिणेकडील निकोपोल शहरावर गोळीबार केला. युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली दोन जण जखमी झाले असून इतर दोन जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत.