मुक्तपीठ टीम
iOS 16 मध्ये iPhone यूजर्सना अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. हे फिचर्स काहीसे अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये दिलेल्या फीचर्ससारखेच दिसतात असे स्पष्ट झाले आहे. हे फिचर्स कंपनीने डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०२२ मध्ये लॉंच केले होते. या अपडेट्सच्या सर्व बीटा व्हर्जन्स पुढील महिन्यापर्यंत लाँच केल्या जातील आणि या वर्षाच्या अखेरीस हे सर्व फिचर्स आयफोन १४ मध्ये उपलब्ध होती. परंतु, तुम्ही अँड्रॉइड यूजर असल्यास, iOS 16 मधील काही नवीन फिचर्स अनेक वर्षांपासून गुगलच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध असलेल्या सर्वांपेक्षा वेगळी वाटत नाहीत. अँड्रॉईडप्रमाणे पाच iOS फीचर्स आहेत जे पूर्णपणे अँड्रॉईड सारखेच आहेत.
आयओएस १६ आणि अॅंड्रॉईडमध्ये असणारं साम्य
लाइव कॅप्शन
- लाइव कॅप्शन हे एक असे फिचर आहे जे iOS 16 साठी बनवले गेले आहे. परंतु, अँड्रॉईडवर आधीपासूनच अस्तित्वात आहे.
- अॅपलने सांगितले की लाइव्ह कॅप्शन कोणत्याही ऑडिओ कंटेंट, फेसटाइम कॉल, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप किंवा आयफोन, आयपॅड आणि मॅकवर इंग्रजीमध्ये वैयक्तिक संभाषण ट्रांसक्रिप्ट करू शकते.
- गुगलने अँड्रॉईड १० च्या रिलीझसह लाइव्ह कॅप्शन फिचर आणण्यास सुरुवात केली.
लॉकस्क्रीन एक्सपिरियन्स
- iOS 16 च्या सर्वात चर्चेत असलेल्या फिचर्सपैकी एक म्हणजे लॉकस्क्रीन अनुभव जो लॉकस्क्रीनवर झटपट नजर टाकण्यासाठी विजेट्स जोडू देतो.
- यामध्ये हवामान, एअरपॉड्सची बॅटरी स्थिती, कॅलेंडर इव्हेंट आणि बरेच काही समाविष्ट आहे.
- iOs16 वरील नवीन लॉकस्क्रीन फिचर २०१२ मध्ये अँड्रॉईड ४.२ जेली बीनने लाँच केले हेते.
- गुगलने यूजर्सना लॉकस्क्रीनवर क्लॉक, कॅलेंडर आणि इतर घटक जोडण्याची परवानगी दिली. अँड्रॉईड ५.० सह, गुगलने हे फिचर काढून टाकले परंतु Samsung One UI अजूनही प्रीसेट लॉकस्क्रीन विजेट्स प्रदान करते.
फोटो आपोआप शेअर करण्याची सुविधा
- लोकांनी या फिचरची खूप मागणी केली आणि अखेर अॅपलने हे फिचर यूजर्ससाठी लॉंच केले आहे.
- गुगलने हे फीचर २०१७ मध्येच लॉंच केले होते. त्यामुळे अॅपलचे iCloud Shared Photo Library फिचर थेट गुगलच्या पेज बुकमधून काढून टाकण्यात आले आहे.
- iCloud चे शेअर केलेले फोटो लायब्ररी फिचर पाच इतर लोकांसोबत शेअर केले जाऊ शकते आणि प्रत्येकाला फोटो जोडणे, एडिट करणे, कॅप्शन देणे आणि डिलीट करता येते.
पाठवलेले ई-मेल्स अनसेंड करण्याची सुविधा
- iOs 16 मध्ये लोकांना त्यांचे ई-मेल शेड्यूल करण्यास आणि अंडू करण्याची परवानगी मिळते. २. iOS 16 च्या इन-बिल्ट मेल अॅपसह समान फिचर्स वापरण्यास मिळतील.
- आयफोनवरील मेल अॅप यूजर्सना वेळेपूर्वी पाठवले जाणारे ईमेल शेड्यूल करण्याचे स्वातंत्र्य देते.
- यामध्ये पाठवलेले ईमेल डिलीट करण्यासाठी फक्त १० सेकंद मिळतात.
ट्रांसलेटर कॅमेरा फिचर
- एकदा iOs16 व्यापकपणे उपलब्ध झाल्यानंतर, iOS यूजर्सना आयफोनच्या कॅमेरा अॅपद्वारे कॅप्चर केलेले मजकूर ट्रांसलेट करणे सोपे जाईल.
- यूजरला फक्त कॅमेरा अॅप उघडावे लागेल आणि नंतर ते ट्रांसलेट करण्यासाठी मजकुराकडे निर्देशित करावे लागेल.
- अँड्रॉइडमध्ये हे फिचर गुगल ट्रांसलेट या नावाने उपलब्ध आहे.