मुक्तपीठ टीम
महिला आणि बालविकास मंत्रालय १ ते ८ मार्च दरम्यान ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह’ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून एक विशेष सप्ताह म्हणून साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आठवडाभर साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आणि महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर आधारित समाज माध्यम उपक्रमांचे आयोजन होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि तज्ञ यांच्या भागीदारीने आणि महिला आणि बालकांच्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी थेट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या सोहळ्याचा प्रारंभ उद्यापासून म्हणजेच एक मार्चपासून ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. या दिवशी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग देखील आपला वर्धापनदिन साजरा करणार आहे. या कार्यक्रमात बालकांवर विशेष भर असेल आणि बालकांच्या एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल आणि बालकांना लाल किल्ल्याची मार्गदर्शनपर सफर घडवण्यात येईल.
सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी ८ मार्च २०२२ रोजी नारी शक्ती पुरस्कार आणि सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या महिला पोलिस प्रतिनिधींसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन परिषद या दोन प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. महिलांच्या असामान्य कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि विविधता असलेल्या उपस्थितांमध्ये एक संघटित बळ म्हणून भारतभरात स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करण्याची भावना जागृत करण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्त्री-पुरुष समानता, समता आणि महिलाच्य सक्षमीकरणासंदर्भात झालेल्या प्रगतीचा गौरव या दिवसाच्या निमित्ताने करण्यात येईल. त्याचबरोबर या संदर्भात झालेल्या उल्लेखनीय कामगिरींचे प्रभावी दर्शन घडेल आणि स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्याचा ध्यास निर्माण होईल.