मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याने चाहत्यांकडून संताप व्यक्त आहे. नुकताच भाजपतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जांभोरी मैदानातील भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला आहे. राहुल देशपांडे यांचे गाणे थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.
कार्यक्रमात गायकाचा अपमान केल्याने लोक चांगलेच संतापले. या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये युजर्स भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
दिपोत्सवानिमित्त आयोजित सांगीतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काल संध्याकाळी वरळी येथे मिहीर कोटेचा आणि आज सकाळी कोथरूड, पुणे डहाणूकर कॉलनी येथे हर्षाली माथवड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कलाप्रेमी नागरिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/AmuLxDYpPX
— Rahul Deshpande (@deshpanderahul) October 20, 2022
अपमानास्पद वर्तवणूक करूणही राहुल देशपांडे शांतच!
- व्हिडीओमध्ये दिसत आहे की राहुल आपला परफॉर्मन्स देत आहे आणि दुसरीकडे टायगर श्रॉफ कार्यक्रमात पोहोचला आहे.
- काही लोक त्यांचे परफॉर्मन्स थांबवण्यास सांगतात. अशाप्रकारे कार्यक्रम थांबवल्याचा राहुल देशपांडे नाराज होतात आणि म्हणतात की, ते आपले गाणे मध्येच सोडू शकत नाही.
- पुढे व्हिडीओमध्ये असे दिसून येते की मुलुंडमधील भाजप आमदार मिहिर कोटेचा स्टेजवर टायगर श्रॉफचे स्वागत करतात आणि राहुल देशपांडे यांना त्यांचे गाणे थांबवावे लागले.
या घटनेत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या नावाचाही समावेश आहे. हे प्रकरण इतके वाढले की सोशल मीडियावर मराठी कलाकार विरुद्ध बॉलीवूड कलाकार अशी चर्चा सुरू झाली.
राहुल देशपांडेंच्या चाहत्यांंचा ट्विटरवर संताप…
https://twitter.com/Brunonsk2121/status/1583113747803312130?s=20&t=z5hHvJGVOmrh1sMxRFGsUw
https://twitter.com/surendragaware/status/1583157638325379072?s=20&t=z5hHvJGVOmrh1sMxRFGsUw
हे आपले मराठी कलाकार, यांच्या सन्मानासाठी लोक सोशल मीडियासाठी भांडत आहेत, आणि हे इथे हांजी हुजुर करत एका शब्दाने पण निषेध न नोंदवता उलट आभार व्यक्त करत आहेत.
— मी महाराष्ट्रीयन (@dmangesh04) October 22, 2022
पण इथून पुढे जर तुमच्या कार्यक्रमात कोणी व्यत्यय आणला तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही
— Shantanu (@SHANTAN51140895) October 22, 2022
https://twitter.com/anubhavpatil/status/1583766426619609089?s=20&t=z5hHvJGVOmrh1sMxRFGsUw