मुक्तपीठ टीम
रशियामध्ये आजपासून इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. फेसबुकने पुतिनविरोधात धोरण स्वीकारत नियम बदलल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इन्स्टाग्रामने रशियाने बंदी घालणं चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे रशियाचे आठ कोटी लोक जगापासून तुटतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यामुळे इन्स्टाग्रामचे ९ कोटी यूजर्स कमी होतील, जाहिरात उत्पन्नावर परिणाम होईल, हेही स्पष्ट आहे.
युद्धामुळे आखाती देशांची चिंता वाढली
- रशिया- युक्रेन युद्धामुळे युरोप तसेच- मध्य पूर्वेतील देश चिंतेत आहेत.
शियावर थेट अवलंबून असलेले हे देश त्याला उघडपणे पाठिंबा देऊ शकत नाहीत किंवा पाश्चात्य शक्तींसोबत उभे राहू शकत नाहीत. - रशियासोबतचे संबंध बिघडू शकतात आणि त्यांना आणखी संकटातून जावे लागेल, अशी भीती मध्यपूर्वेतील देशांना आहे.
रशियाने मागितली चीनकडे मदत…
- रशिया युक्रेन युद्धात रशियाने चीनकडे लष्करी आणि आर्थिक मदत मागितली आहे.
चीनला अमेरिकेकडून थेट धमकी देण्यात आली असताना रशियाकडून ही मदत मागवण्यात आली आहे. - खरतर, रविवारी अमेरिकेने चीनला इशारा दिला होता.
- याअंतर्गत आर्थिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाला मदत करण्यासाठी चीन पुढे आला तर त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतील, असे म्हटले होते.
- रविवारी रात्री उशिरा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याकडून एक व्हिडिओ संदेश जारी करण्यात आला.
- यामध्ये त्यांनी युक्रेनला नो-फ्लाय झोन म्हणून घोषित करण्याची मागणी नाटोकडे पुन्हा एकदा केली.
- यासोबतच युक्रेनच्या आकाशाला नो फ्लाय झोन घोषित न केल्यास लवकरच नाटोच्या भूमीवरही रशियन रॉकेट पडतील, असा इशाराही त्यांनी दिला.