Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीसांच्या पोलीस चौकशीवर शेलारांचा स्थगन, वळसे-पाटील म्हणाले, “ती तर रुटीन चौकशी!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Walse Patil and Fadanvis

मुक्तपीठ टीम

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग आणि पोलीस बदल्यांप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी रविवारी त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी फडणवीसांना नोटीस पाठवल्यामुळे भाजपा नेते आक्रमक झाले होते. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. त्यामुळे फडणवीसांचा जबाब का घेतला गेला याच उत्तर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

 

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेले प्रश्न मी पाहिले नाही आणि उत्तरही पाहिलं नाही.
  • एसआयटीतील (SIT) डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे.
  • विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला.
  • पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे.
  • तपास करताना सर्कल पूर्ण करावं लागतं.
  • पोलिसांनी काही प्रश्न विचारले तरी उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे.
  • हा रुटीनचा भाग आहे.
  • मी कायदा शिकलो कदाचित माझ्या माहितीत फरक असेल.
  • क्रिमिनल केसेसमध्ये कुणालही इम्युनिटी नाही.
  • फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली.
  • केवळ माहिती घेण्यासाठी नोटीस दिली.
  • जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा किंवा कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा संबंध नाही.
  • तसेच तपास अधिकारी त्याबाबत चौकशी करेल.
  • त्यावरून अंतिम निर्णय घेईल.
  • त्यामुळे हा विषय थांबवा.

 

विरोधी पक्षनेत्यांनाही प्रिव्हलेज काय आहे हे माहीतीय, गृहमंत्री वळसे पाटलांचे प्रत्युत्तर

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा काल सायबर पोलिसांनी जबाब नोंदवला.
  • त्यामुळे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला.
  • त्याला उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी ही स्पष्टोक्ती दिली.
  • मला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ३७ वर्ष झाले आहे.
  • विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली.
  • सभागृहाच्या प्रथा, परंपरा आणि प्रिव्हलेज याबाबतची मला माहीत आहे.
  • विरोधी पक्षनेत्यांनाही प्रिव्हलेज काय आहे हे माहीत आहे.
  • सदस्यांच्या प्रिव्हलेजबाबत दुमत नाही.
  • तुम्ही ज्या केसेस वाचून दाखवल्या त्याबाबत कुणी विचारू शकत नाही.

 

यासाठीच घेतला जबाब…

  • पण एक घटना अशी घडली, एसआयटीमधून चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग केलं गेलं.
  • परवानगी न घेता फोन टॅपिंग केलं.
  • याबाबत विरोधी पक्षनेत्याने सभागृहात प्रश्न मांडला.
  • त्याआधीच आम्ही एक समिती नेमली होती.
  • समितीच्या अहवालानंतर एक गुन्हा दाखल झाला.
  • अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला.
  • तपास अधिकाऱ्याकडे तपासाचं काम असतं.
  • त्याने २४ लोकांचे जवाब घेतले.
  • त्यांना जे जे वाटलं तसा त्यांनी तपास केला.
  • सीआरपीसीच्या १६०च्या नोटीसमध्ये दुसरं काही नाही.
  • तपास अधिकाऱ्यांना कुणालाही जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्याचा अधिकार आहे.
  • आधी प्रश्नावली पाठवली होती.
  • विरोधी पक्षनेत्यांना काही कारणाने उत्तर देता आलं नाही.
  • त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्याने १६०ची नोटीस पाठवली.
  • याचा अर्थ तुम्ही जबाब द्या.
  • पोलीस ठाण्यात घ्यायचा की घरी घ्यायची याची चर्चा झाली आणि जबाब घेतला.

Tags: devendra fadanvisdilip walse patilphone tappingPoliceदिलीप वळसे पाटीलदेवेंद्र फडणवीसपोलीस बदलीफोन टॅपिंग
Previous Post

मेटाला मोठा हादरा! रशियामध्ये आजपासून इन्स्टाग्रामवर बंदी!!

Next Post

शरद पवार हे तपास यंत्रणांचे टार्गेट…संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Next Post
sanjay raut-sharad pawar-devendra fadnvis

शरद पवार हे तपास यंत्रणांचे टार्गेट...संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!