Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रतिकुलतेवर मात करत शेतकऱ्याचा मुलगा झाला न्यायाधीश! सोलापूरच्या काशीनाथ सुरवसेंची संघर्ष गाथा…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
Adv. Kashinath Survase

रोहित पाटील / सोलापूर

ज्यावेळी जिद्द, चिकाटी आणि मेहनत केली असेल त्यावेळी त्या प्रयत्नांना यश येतेच येते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील शेतकरी कुटुंबातील अ‍ॅड. काशीनाथ तिपण्णा सुरवसे यांची संघर्षमय यशोगाथा अशीच आहे. त्यांनी अतिशय कष्ट केले. शिक्षणानं ज्ञानाचे पंख मिळवले. आपल्या परिश्रमांनी त्या पंखांना आणखी बळ देत कायद्याच्या विश्वात उड्डाण केले. आज त्यांनी एक शिखर गाठलं आहे ते न्यायाधीशपदाचं!

 

घरची हालाखीची परिस्थिती असताना ही सुरवसे यांनी अनेक संकटांना सामोरे जात आपले शिक्षण घेतले. अ‍ॅड. काशीनाथ सुरवसे यांचे प्राथमिक शिक्षण नांदणी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण लोकसेवा हायस्कुल मंद्रुप येथे झाले. तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण संतोष भिमराव पाटील महाविद्यालयात घेतले.

 

शिक्षण घेत असतानाही काशीनाथ सुरवसे वडिलांना शेतातील कामात मदत करायचे. शेतीतील कामे सांभाळतानाही त्यांनी शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शिक्षणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही.

 

बीएची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला या ठिकाणी एलएलबी पूर्ण केल्यानंतर सोलापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी वकिली सुरु केली. त्यांनी अतिशय प्रयत्न केले. त्यांना दुसर्‍या प्रयत्नात यश मिळाले आणि ते न्यायाधीश परिक्षेत उत्तीर्ण झाले. अ‍ॅड.अझमुद्दीन शेख, अ‍ॅड. गणेश पवार, अ‍ॅड. पी पी कुलकर्णी या सर्वांचा त्यांना सहवास लाभला आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचे काम केले.

 

अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे अ‍ॅड. सुरवसे यांना दुसर्‍या प्रयत्नात यश मिळाले. ते न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण झाले. ही परिक्षा १ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. तर या पदासाठी मुख्यपरिक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. तर यासाठी २३ मार्च २०२२ रोजी मुलाखत घेण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या.त्यांच्या या यशामध्ये त्यांना सहकारी वकील मित्र, आई वडील, पत्नी, भाऊ यांचे सहकार्य मिळाल्याचे अ‍ॅड. सुरवसे यांनी सांगितले.


Tags: Adv. Kashinath SurvaseFarmer's songood newsInspirational StoryJudgemuktpeethSangharsh Gathasolapurअ‍ॅड. काशीनाथ सुरवसेचांगली बातमीन्यायाधीशप्रेरणादायी कथामुक्तपीठशेतकरी मुलगासंघर्ष गाथासोलापूर
Previous Post

किरीट सोमय्यांचा इशारा: “उद्धव ठाकरेंविरोधात कारवाईशिवाय गप्प बसणार नाही!”

Next Post

पोलिसांच्या किरकोळ रजेत वाढ होणार! १२ दिवसांवरून २० दिवसांवर!!

Next Post
police

पोलिसांच्या किरकोळ रजेत वाढ होणार! १२ दिवसांवरून २० दिवसांवर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!