मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाचं बळ आणखी वाढलं आहे. नौदलाच्या ताफ्यात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विमानवाहू नौकेचं देशसेवेसाठी जलावतरण केलं. विक्रांत ही भारतातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. आता भारत देखील स्वतःची विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक यादीत सामील झाला आहे. स्वदेशी विमानवाहू युद्धनौका भारताच्या नौदलाच्या क्षमतेत किती उपयोगी ठरेल? भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका किती शक्तिशाली आहे? चला जाणून घेऊया…
आयएनएस विक्रांत कशी झाली तयार ?
- भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांतमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू स्वदेशी नाहीत.
- काही भाग परदेशातूनही आयात करण्यात आले आहेत.
- पण या संपूर्ण प्रकल्पातील ७६ टक्के हा देशातील उपलब्ध संसाधनांचा बनलेला आहे.
- विक्रांतच्या बांधकामासाठी लागणारे युद्धनौकेसाठी आवश्यक उच्च दर्जाचे स्टील भारतीय पोलाद प्राधिकरणाने (सेल) तयार केले होते.
- हे पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेची (डीआरडीएल) मदतही घेण्यात आली होती.
- सेलची युद्धनौका पातळीचे स्टील बनवण्याची क्षमता भविष्यातही देशाला खूप मदत करेल.
- युद्धनौकेतील वस्तू स्वदेशी असून त्यामध्ये २३ हजार टन स्टील, अडीच हजार टन स्टील, २५०० किमीची इलेक्ट्रिक केबल, १५० किमीचे पाइप आणि २ हजार व्हॉल्व्ह यांचा समावेश आहे.
- याशिवाय एअरक्राफ्ट कॅरिअरमध्ये समाविष्ट असलेल्या हुल बोट्स, एअर कंडिशनिंगपासून रेफ्रिजरेशन प्लांट्स आणि स्टेअरिंग पार्ट्सही देशातच बनवले जातात.
- या विमानवाहू नौकेच्या निर्मितीमध्ये भारतातील अनेक बड्या औद्योगिक उत्पादकांचा सहभाग होता.
- यामध्ये भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BEL), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), किर्लोस्कर, L&T, केल्ट्रॉन, जीएसएसई, वार्टसिला इंडिया आणि इतरांचा समावेश होता.
- याशिवाय १०० हून अधिक मध्यम आणि लघु उद्योगांनी जहाजावरील स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्रीच्या निर्मितीसाठी मदत केली.
- ही युद्धनौका बनवण्यात ५० भारतीय उत्पादकांचा सहभाग होता.
- त्याच्या बांधकामादरम्यान, दररोज दोन हजार भारतीयांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला, तर इतर ४०,००० लोकांना या प्रकल्पात अप्रत्यक्षपणे काम करण्याची संधी मिळाली.
- ही युद्धनौका बांधण्यासाठी २३ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला.
वाचा:
INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य…
INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य…