मुक्तपीठ टीम
लाडक्या बाप्पाचे आगमन आज होत आहे. ‘सुखकर्ता, दुःखहर्ता व विघ्नहर्ता’ असलेल्या गणेशाच्या या उत्सवात सामाजिक जाणिवेचेही दर्शन घडते. निसर्गाच्या ऱ्हासाला, पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या ‘ई-कचरा’ संकलनात गणेश मंडळेही सरसावली आहेत. समाज प्रबोधनासाठी अग्रेसर वंचित विकास या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ई-कचऱ्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
गणेशोत्सवात दहा दिवस गणेश मंडळांनी ई-कचरा संकलन केंद्रे उभारावीत, असे आवाहन वंचित विकास संस्थेने केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. नारायण पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, नाना पेठ, गणेश पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, कसबा पेठ, डेक्कन, मार्केटयार्ड, सहकारनगर, अरण्येश्वर, कात्रज, सिंहगड रस्ता आदी भागातील गणेश मंडळांनी ‘ई-कचरा’ संकलनात पुढाकार घेतला आहे. संकलित ई-कचरा वंचित विकासच्या नारायण पेठेतील कार्यालयात असलेल्या कायमस्वरूपी ई-कचरा जमा करण्याचे आवाहन वंचित विकासतर्फे करण्यात आले आहे.
या मंडळांनी घेतला सहभाग
लोकमान्य टिळक सार्वजनिक मंडळ, नागनाथ पार सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पेरुगेट चौक मित्र मंडळ, समाज विकास मंडळ, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, हिंदमाता तरुण मंडळ, जय जवान मित्र मंडळ, सोमवार पेठ गोसावी पुरा सार्वजनिक मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट, कस्तुरे चौक तरुण मंडळ, सुंदर गणपती तरुण मंडळ, ओम हरिहरेश्वर मंडळ, मुठेश्वर मित्र मंडळ, बालकुमार तरुण मंडळ, शनिवार पेठ मेहूणपुरा गणेश मंडळ, विनायक मित्र मंडळ, ऋतुराज मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ,अरण्येश्वर, अशोक तरुण मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट, एकता मित्र मंडळ कात्रज, नवजीवन मित्र मंडळ, माती गणपती मंडळ ट्रस्ट, वीर तानाजी तरुण मंडळ आदी.