Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात दोन लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 22, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
सोसायटी अचिवर्स पुरस्कार' प्रदान 2

मुक्तपीठ टीम

मुंबईसह राज्यात दोन लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात केले.            

सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका मीनाताई खडीकर, अभिनेत्री हेमामालिनी, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेता अनुपम खेर, सोनू सूद, सिद्धार्थ मल्होत्रा आदी मान्यवरांसह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अमृता फडणवीस यांना सोसायटी अचिव्हर्स अवॉर्ड देवून गौरविण्यात आले.            

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम सोसायटी मासिक गेली अनेक दशके करीत आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून लाखो वाचकांना प्रेरणा देण्याचा सोसायटी मासिकाचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार महिन्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.            

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबई आणि राज्याचे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्व मिळून मुंबई आणि महाराष्ट्राला अधिक सर्वोत्तम बनवूया. विविध क्षेत्रात राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा आज गौरव झाला आहे. सोसायटी मासिकाने सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार सुरू केल्यास तो घ्यायला आम्ही नक्की येवू, असेही ते म्हणाले.            

यावेळी मॅग्ना प्रकाशन समूहाचे अध्यक्ष नारी हिरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Tags: Cm Eknath ShindeMaharashtramumbaiमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

शिवडी – वरळी उन्नत मार्गातील रहिवाशांचे शिरोडकर मंडईत पुनर्वसन

Next Post

न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची नियुक्ती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
cm eknath shinde

न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची नियुक्ती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!