मुक्तपीठ टीम
वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्र सरकारकडून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचा मोठा फायदा होता आहे. विशेषत: मुंबईत कडक निर्बंधांमुळे लोक घरात लॉक झाल्यापासून कोरोनाही डाऊन होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात मुंबईत यश येताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून मंबईत कोरोनाची नवी रुग्णसंख्या ही सातत्याने कमी होताना दिसत आहे. आज तर मुंबईत नव्या रुग्णांची संख्या चार हजाराच्या खाली गेली आहे.
१८ एप्रिल रोजी येथे ८,४०० नवीन रुग्णांची नोंद झाली होती. २५ एप्रिल पर्यंत ही संख्या हळू हळू ५,५४२ वर घसरली आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी जवळजवळ पंधरा दिवसाने वाढला आहे.
मुंबईकर घरात लॉक, कोरोना होतोय डाऊन!
दिनांक |
नवे रुग्णसंख्या |
४ एप्रिल २०२१ | ११,१६३ |
७ एप्रिल २०२१ | १०,४२८ |
९ एप्रिल २०२१ | ९२०० |
११ एप्रिल २०२१ | ९००० |
१३ एप्रिल २०२१ | ७८९८ |
१५ एप्रिल २०२१ | ८२१७ |
१६ एप्रिल २०२१ | ८८३९ |
१८ एप्रिल २०२१ | ८४०० |
१९ एप्रिल २०२१ | ७३८१ |
२० एप्रिल २०२१ | ७२१४ |
२१ एप्रिल २०२१ | ७६८४ |
२२ एप्रिल २०२१ | ७४१० |
२३ एप्रिल २०२१ | ७२२१ |
२४ एप्रिल २०२१ | ५८८८ |
२५ एप्रिल २०२१
२६ एप्रिल २०२१ |
५५४२
३८४० राज्य आरोग्य विभाग – मुंबई मनपा ताजी माहिती ३८७६,
|
महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ८७% रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत. अशा लक्षणविरहित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. मुंबईत १८ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग वेग १.५३% होता जो आता खाली १.१७% वर आला आहे. सर्व २४ प्रभागांमधील कोरोनाचा संसर्ग वेग २% पेक्षा कमी आहे. संसर्ग वेग ८ प्रभागांमध्ये १% खाली आहे.
Mumbai drops to 3792 cases on 41 k tests clearly we r turning around with ATM strategy of Assess Triage and Transfer and Management congratulations team MCGM
— Dr. Shashank Joshi (@AskDrShashank) April 26, 2021