Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी HLLचे स्वदेशी बनावटीचं एचटीटी-४० प्रशिक्षण विमान! जाणून घ्या आहे तरी कसं…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
HTT-40

मुक्तपीठ टीम

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HALने आपलं कर्तृत्व दाखवून दिलं आहे. दिवाळीच्या आधीच गोड बातमी दिली आहे. HALने एचटीटी-४० हे स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षण विमान तयार केलं आहे. त्यामुळे देश त्याबाबतीत आत्मनिर्भर होतानाच विदेशी चलन वाचण्याचा मोठा फायदाही होणार आहे. तसेच भारतात वैमानिक घडवणं सोपं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानाचे नुकतेच अनावरण केले. या प्रसंगी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कसं आहे स्वदेशी प्रशिक्षण विमान?

  • एचटीटी-४० या विमानाची संकल्पना आणि विकसन एचएएल अर्थात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने केले आहे.
  • या विमानात अत्याधुनिक वर्तमानकालीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.
  • हे विमान वैमानिक-स्नेही असेल अशा रीतीने तयार करण्यात आले आहे.
  • या विमानाच्या रचनेत कंपनीने तयार केलेल्या ६०% भागांचा वापर तसेच काही प्रमाणात खासगी क्षेत्राच्या समन्वयातून निर्माण भागांचा वापर केला आहे.
  • हे विमान म्हणजे ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेचे झळाळते उदाहरण आहे.

स्वदेशी प्रशिक्षण विमानाचा उपयोग…

  • एचटीटी-४० हे विमान मुलभूत विमान चालन प्रशिक्षण, हवाई कसरती, विशिष्ट साधनांसह उड्डाण आणि क्लोज फॉर्मेशन उड्डाणांसाठी वापरण्यात येणार आहे.
  • तसेच दिशादर्शन आणि रात्रीच्या वेळेतील उड्डाण करण्यासाठी दुय्यम वापराकरिता या विमानाचा उपयोग केला जाईल.
  • भारतीय संरक्षण दलांच्या प्रशिक्षणविषयक प्राथमिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विमानाची रचना करण्यात आली आहे.

HALच्या एचटीटी-४० विमानाची विलक्षण वैशिष्ट्ये

  • या विमानात अत्यंत दक्षपणे तपासणी केलेले टर्बो-प्रॉप इंजिन आहे.
  • या विमानामध्ये अत्याधुनिक हवाई तंत्रज्ञान, वातानुकुलीत कक्ष आणि इजेक्शन सीट्स बसविण्यात आल्या आहेत.
  • चालत्या विमानात वैमानिकांची अदलाबदल, इंधन पुनर्भरण आणि अत्यंत कमी वेळात मागे फिरण्याची क्षमता अशी अत्यंत विलक्षण वैशिष्ट्ये या विमानात उपलब्ध आहेत.
  • या विमानाच्या पहिल्या उड्डाणापासून सहा वर्षांच्या विक्रमी वेळेत प्रमाणीकरणासाठी आवश्यक सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
  • एचटीटी-४० या विमानाने सर्व यंत्रणाविषयक चाचण्या, सर्व प्रकारची पीएसक्यूआर कामगिरी, गरम हवामान, समुद्र पातळी तसेच क्रॉस विंड चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
  • पावसाच्या माऱ्याला देखील सहन करण्याची विमानाची क्षमता सिद्ध झाली आहे.
  • सैनिकी हवाई उड्डाण योग्यता आणि प्रमाणीकरण केंद्राकडून (CEMILAC). या विमानाला परिचालनासाठी प्राथमिक परवानगी मिळाली आहे.

Tags: gandhinagargood newsGujaratHindustan Aeronautics LimitedHTT-40muktpeethएचटीटी-४०गांधीनगरगांधीनगर महानगरपालिकागुजरातघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठहिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड
Previous Post

भाजपा आता तरी मनसेला निष्ठेनं सोबत घेणार की फ्लर्ट करून निवडणुकीत एकटं सोडणार?

Next Post

प्लास्टिकविरोधी मोहिम: ४६ टन वजनाच्या सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जप्त, ४१ लाख दंड वसूल!

Next Post
Plastic

प्लास्टिकविरोधी मोहिम: ४६ टन वजनाच्या सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जप्त, ४१ लाख दंड वसूल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!