Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताचे पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निर्धारित वेळेआधीच पूर्ण!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
petrol

मुक्तपीठ टीम

परदेशी इंधनावरील परावलंबीत्व कमी करतानाच स्वदेशातील शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी भारताना पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यासाठी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी देत ती क्षमता वाढवली गेली. त्याचबरोबर पेट्रोलमध्ये २०३०पर्यंत २० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले. त्याचा पहिला टप्पा २०२२च्या नोव्हेंबरमध्ये १० टक्के मिश्रण करण्याचा ठरवण्यात आला. हा टप्पा निर्धारित कालावधीच्या पाच महिनेआधीच गाठण्यात आला आहे. एवढंच नाही तर २० टक्के मिश्रणाचा टप्पाही २०३०ऐवजी पाच वर्षेआधी २०२५-२६मध्येच गाठला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होणार आहेच, पण देशाचं पेट्रोल आयातीसाठीचं परकीय चलनही वाचणार आहे.

भारताचे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य

  • भारत सरकार पुढील कारणांसाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमाचा प्रचार करत आहे:
  • देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी
  • इंधनाच्या आयतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी
  • परदेशी चलन वाचवण्यासाठी, पर्यावरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी

देशाच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने २०१८ मध्ये अधिसूचित केलेल्या ‘जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरणामध्ये २०३० सालापर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे सूचक लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तरीही, २०१४ पासून सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे झालेली उत्साहवर्धक कामगिरी लक्षात घेता २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य वर्ष २०३० ऐवजी २०२५-२६मधेच पूर्ण होणार आहे.

माननीय पंतप्रधानांनी जून २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या “भारतामधील इथेनॉल मिश्रणाचा मार्ग २०२०-२५” मध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे ध्येय गाठ्ण्यासाठीचा मार्ग तपशीलवार मांडण्यात आला होता.

मात्र, सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) केलेल्या समन्वयीत प्रयत्नांमुळे १०% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नोव्हेंबर, २०२२ या नियोजित वेळेच्या खूप आधी पूर्ण झाले आहे, यानुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या ओएमसी नी देशभर पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

गेल्या ८ महिन्यांमधील या उद्दिष्ट पूर्तीने केवळ भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवली नाही, तर ४१ हजार ५०० कोटी पेक्षा जास्त परदेशी चलनाच्या स्वरुपात त्याचा लाभ झाला, हरित वायु उत्सार्जानामध्ये (GHG) २७ मेट्रिक टन घट झाली तर शेतकर्‍यांना ४० हजार ६०० कोटी रुपये खर्चाची रक्कम प्रदान करण्यात आली.

सरकारने केलेल्या या सर्व उपाययोजनांमुळे ईबीपी कार्यक्रम २०२५-२६ पर्यंत २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: ethanol blendsgood newsIndiamuktpeethpetrolइथेनॉल मिश्रणचांगली बातमीपेट्रोलभारतमुक्तपीठ
Previous Post

जंगलातील नदीचं पाणी स्वच्छ करून झटपट कसं प्याल? पाहा आदिवासींचा नैसर्गिक जुगाड…

Next Post

महिला सुरक्षेसाठी सांगली महापालिका क्षेत्रात आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर!

Next Post
Sangli Municipal Corporation

महिला सुरक्षेसाठी सांगली महापालिका क्षेत्रात आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!