Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी काश्मिरात भारतातील पहिला इग्लू कॅफे, बाहेर थंड-थंड, आत गरम-गरम

January 31, 2021
in चांगल्या बातम्या
0
#चांगलीबातमी काश्मिरात भारतातील पहिला इग्लू कॅफे, बाहेर थंड-थंड, आत गरम-गरम

मुक्तपीठ टीम

 

स्वित्झर्लंडच्या धर्तीवर काश्मिरातील गुलमर्गमध्ये भारतातील पहिला इग्लू कॅफे तयार करण्यात आलाय. संपूर्ण बर्फाच्या या कॅफेत एका वेळी १६ लोकांची बसण्याची क्षमता आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग हे पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाणारे एक सुंदर हिल स्टेशन आहे. गुलमर्ग समुद्रसपाटीपासून २ हजार ७३० मीटर उंचीवर आहे. गुलमर्गमधील एका स्थानिक हॉटेल ऑपरेटरने देशातील पहिला इग्लू कॅफे बनवला आहे. टुंड्रा प्रदेशात एस्किमो बर्फाचे घर बनवतात. त्याला ते इग्लू म्हणतात. त्याच धर्तीवर हा इग्लू कॅफे उभारण्यात आलाय. बर्फाने बनवलेला हा कॅफे पर्यटक आणि स्थानिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पर्यटक या इग्लूचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हे इग्लू आतून २२ फूट रुंद आणि १३ फुट उंच आहे, तर बाहेरून त्याची रुंदी २४ फूट आणि १५ फूट उंच आहे.

 

igloo

हा इग्लू तयार करणारे वसीम शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांना कॅफे बनवण्याची कल्पना सुचली. तेथे त्यांना बर्फाने बनविलेला कॅफे दिसला. त्याच वेळी त्यांनी गुलमर्गमधील पर्यटकांसाठी यासारखाच कॅफेचे ठरवले. सुरुवातीला, वसीमने आपल्या घरात एक छोटासा इग्लू बनवला, ज्याचे पर्यटकांनी चांगलेच कौतुक केले. त्यानंतर त्यांनी गुलमर्गमध्ये एक मोठा इग्लू कॅफे बांधण्याचे काम सुरू केले.

 

वसीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा इग्लू बनवण्यासाठी २० कर्मचाऱ्यांना १५ दिवस लागले. कर्मचार्‍यांनी दोन शिफ्टमध्ये हा इग्लू बनविला. इग्लू तयार करण्यासाठी बर्फ दाबून मोठ्या विटांचे आकार देतात. मग त्या विटा सामान्य विटांप्रमाणे जोडल्या जातात. परंतु सिमेंटऐवजी फक्त बर्फाचा वापर केला जातो. कॅफेमध्ये खुर्ची असो की टेबल, सर्व काही बर्फाने बनलेले आहे. कॅफेमध्ये ४ टेबल आहेत, जिथे १६ लोक आरामात बसून खाऊ शकतात. बर्फाने बनवलेल्या या खुर्च्यांवर मेंढीचे कातडे घालण्यात आले आहे. लोक या इग्लूमध्ये येतात आणि बर्फाळ भागात इग्लूमध्ये राहणाऱ्या एस्किमोंच्या जीवनाचा आंनद घेतात.”

 

इग्लू थंड-थंड, आत गरम-गरम!

• इग्लू बर्फाचा असल्याने बाहेरून पाहिल्यावर असे वाटते की आतील भागात बरीच थंडी असेल
• आश्चर्याची बाब म्हणजे इग्लूचे बाहेरील तापमानापेक्षा आतील तापमान जास्त असते
• भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार, दाबलेला बर्फ इन्सुलेशन म्हणून कार्य करते आणि कोणत्याही उष्णतेस बाहेर पडू देत नाही
• हे इग्लू बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून देखील संरक्षण करते
• याचा परिणाम असा होतो की आतमधील उष्णता आतच राहते
• जर बाहेरील तापमान उणे १० असेल तर आतील तापमान ५ ते १० अंशांदरम्यान असते

वसीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “त्यांनी पर्यटकांसाठी हे इग्लू उघडल्यापासून त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही तासातच आमच्याकडे ३०पेक्षा जास्त बुकिंग झाल्या. गर्दी इतकी वाढली की आता आम्ही फक्त बुकिंगच्या माध्यमातून या इग्लू कॅफेमध्ये प्रवेश देण्याचे ठरविले आहे. वसीम यांना आशा आहे की, या इग्लूमुळे गुलमर्गमधील पर्यटनाला आणखी चालना मिळेल.

 

कसा आहे इग्लू कॅफे?

• इग्लू कॅफे जम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये आहे
• हे इग्लू अशा ठिकाणी तयार केले गेले आहे जेथे सूर्यप्रकाश कमी आहे
• मार्चपर्यंत पर्यटकांसाठी हा इग्लू खुला असेल कारण गुलमर्गमधील तापमान मार्चपर्यंत मायनस मध्ये असते
• वसीमचा दावा आहे की त्यांचा इग्लू सध्या आशियातील सर्वात मोठा इग्लू आहे
• लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदीसाठीही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत
• या इग्लूला आशिया खंडातील सर्वात मोठ्या इग्लूचा किताब देखील मिळू शकेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: GulmargHill StationIglooigloo cafeIndiaIndia's first iglooKashmirMaharashtra TourismSwitzerlandTourismगुलमर्गस्वित्झर्लंडहिल स्टेशन
Previous Post

मुंबईकरांसाठी मेट्रोची नवी मार्गिका जूनपर्यंत सुरू होणार!

Next Post

#चांगलीबातमी गुन्हेगार पुनर्वसनाचं ‘गुजरात मॉडेल’, आठ कंपन्या कैद्यांना काम देणार

Next Post
gujrat jail

#चांगलीबातमी गुन्हेगार पुनर्वसनाचं 'गुजरात मॉडेल', आठ कंपन्या कैद्यांना काम देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!