मुक्तपीठ टीम
एचएस प्रणॉयने निर्णायक पाचव्या सामन्यात जबरदस्त कामगिरी बजावली आहे. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस चषक बॅडमिंटन २०२२ च्या अंतिम फेरीत डेन्मार्कचा ३-२ असा पराभव केल्यानंतर, त्याने थॉमस कप बॅडमिंटन २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला.
भारतीय बॅडमिंटन संघ तब्बल ४३ वर्षांनंतर थॉमस चषकाच्या अंतिम फेरीत
- भारतीय संघाने १९७९ पासून उपांत्य फेरीच्या पुढे कधीच प्रगती केली नव्हती.
- पण त्याने २०१६ च्या चॅम्पियन डेन्मार्कचा पराभव करत लढाऊ मनोवृत्ती दाखवली.
- जागतिक चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत आणि दुहेरीतील आठव्या क्रमांकावरील सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने भारताला अंतिम फेरीच्या शर्यतीत रोखले, परंतु एचएस प्रणॉयने २-२ अशा बरोबरीनंतर संघाला इतिहास रचण्यास मदत केली.
जखमी असूनही प्रणॉयचा तुफानी अंदाज
- जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या रॅसमस गेमकेविरुद्ध, प्रणॉयला कोर्टवर घसरल्यानंतर घोट्याला दुखापत झाली होती.
- परंतु वैद्यकीय वेळ संपल्यानंतरही भारतीय खेळाडूने आपला लढा सुरूच ठेवला.
- कोर्टवर त्याला वेदना होत होत्या पण या त्रासाला न जुमानता त्याने १३-२१, २१-९ २१-१२ असा विजय मिळवून भारताचे नाव उंचावले.
भारताने पाच वेळ जिंकलेल्या चॅम्पियन संघ मलेशियाचा पराभव केला
- पाच वेळ जिंकलेल्या चॅम्पियन मलेशियाचा ३-२ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी ४३ वर्षांची प्रतीक्षा संपवणाऱ्या भारतीय संघाची ही उत्कृष्ट कामगिरी होती.
- वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनला हिक्टर एक्सेलसेनकडून १३-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला आणि डेन्मार्कने १-० अशी आघाडी घेतली.
रंकीरेड्डी आणि शेट्टी यांनी दुहेरीचा सामना जिंकला
- रंकिरेड्डी आणि शेट्टी यांनी पहिला दुहेरी सामना जिंकला.
- भारतीय जोडीने दुसऱ्या सामन्यात किम अस्ट्रप आणि मॅथियास क्रिस्टियनसेन यांचा २१-१८, २१-२३, २२-२० असा पराभव करत भारताची १-१ अशी बरोबरी केली.
- त्यानंतर जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँडर अँटोन्सेनचा २१-१८, १२-२१, २१-१५ असा पराभव करत २-१ अशी आघाडी घेतली.
- दुहेरीत भारताची दुसरी जोडी कृष्णा प्रसाद गारागा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला यांना अँडर्स स्करुप रासमुसेन आणि फ्रेडरिक सोगार्ड यांच्याकडून १४-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. पण अनुभवी भारतीय प्रणॉयने पहिला गेम हरल्यानंतर पुनरागमन करत आपल्या संघाला विजयाकडे नेले.