मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने एसी इकॉनॉमी (3E) श्रेणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन श्रेणी १४ महिन्यांपुर्वीच सुरु करण्यात आली होती, परंतु भारतीय रेल्वेने ट्रेनमधील एसी इकॉनॉमी (3E) वर्ग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर आता (3E) वर्ग 3A मध्ये विलीन केले जातील. या बोगीला अधिकृतपणे (3A) म्हणतात. एसी-३ टायरच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही, त्याचे शुल्क समान राहतील. रेल्वेने सप्टेंबर २०२१ मध्ये (3E) वर्ग सुरू केला होता.
दोन्ही कोचमध्ये नेमका फरक काय?
- एसी-३ टियर (3A) मध्ये बर्थची संख्या ७२ आहेत.
- एसी-३ (3E) मधील बर्थची संख्या ८३ आहे.
- एसी-३ (3E) मध्ये ११ सीट्स जास्त आहेत.
- अपंगांसाठीएक अनुकूल शौचालयही आहे.
- एसी-३ (3E) इकॉनॉमी कोचमध्ये मोबाइल फोन आणि मॅगझिन होल्डरसह, अग्निसुरक्षा देखील आहे.
- यात लाईट, एसी व्हेंट, यूएसबी पॉइंट, मोबाईल चार्जिंग पॉइंट या सगळ्या सुविधा कोचमध्ये उपलब्ध आहेत.
- प्रत्येक बर्थसाठी वैयक्तिक एसी व्हेंट प्रदान करण्यासाठी एसी डक्टिंगची पुनर्रचना केली आहे.
- सीट आणि बर्थ, फोल्ड करण्यायोग्य स्नॅक टेबल आणि वॉटर होल्डरचे सुधारित आणि मॉड्यूलर डिझाइन आहे.