Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय रेल्वेची कर्तबगारी! प्रवाशांना मदतीचा हात घेऊन पुढे सरसावले आणि मरणाच्या दारातून प्राण वाचवले

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
indian railway

मुक्तपीठ टीम

रेल्वेने आपल्या सेवेचा दर्जा सुधारतानाच अधिकारी आणि कर्मचारी यांची संवेदनशीलताही वाढवत नेली आहे. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी आणखी जबाबदार आणि कार्यतत्पर बनू लागले आहेत. त्याचा फायदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना होत आहे. गेल्या दोन दिवसांत रेल्वेने दोन प्रवाशांना मदत करून जीवनदान दिले. त्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेली घटना, मुंबईतून बिहारला परत चाललेल्या महिलेची आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका कर्करोगग्रस्त महिलेसोबतचा ऑक्सिजन सिलिंडर संपला. तक्रार येताच रेल्वेने तातडीने बाजारातून सिलिंडर मिळवला. तो त्या महिला प्रवाशापर्यंत पोहचवून तिचे प्राण वाचवले गेले.

जबलपूरहून पाटलीपुत्र स्थानकाकडे जाणाऱ्या मुंबई लोकमान्य टिळक-पाटलीपुत्र सुपरफास्ट ट्रेन १२१४१ च्या एसी टू टायरमधील आहे. त्या गाडीने प्रवास करणाऱ्या ४२ वर्षीय प्रवासी संचिता यांचा श्वास कोंडू लागला. मुंबईतून कर्करोगावर उपचार घेऊन त्या बिहारला परतत होत्या. नातेवाइकांनी पाहिले असता त्यांना दिलेला ऑक्सिजन संपला होता. ट्रेन कटनी स्टेशनजवळ होती. त्यांच्यासोबतच्यांनी रेल्वेच्या रेल्वे टीसीशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. बर्थ क्रमांक २६ वर महिलेची गंभीर स्थिती पाहून टीसीने तात्काळ जबलपूर नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

माहिती मिळाल्यावर, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक विश्व रंजन यांनी सतनाचे स्टेशन व्यवस्थापक कमर्शियल अवध गोपाल मिश्रा यांना नवीन ऑक्सिजन सिलिंडर आणि डॉक्टरांची ट्रेन सतना पोहोचेपर्यंत व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. स्थानिक रेल्वे अधिकारी बाजारातून ऑक्सिजन सिलिंडर घेऊन रेल्वे डॉक्टरांसह आले. रेल्वेचे डॉ. एस. सतीश यांनी महिलेची तपासणी करून तिला ऑक्सिजन पुरवठा सुरु केला.

 


Tags: good newsindian railwaysJabalpur Pataliputra StationmuktpeethMumbai Lokmanya Tilak-Pataliputra Superfast Train 12141railway passengerssaved livesचांगली बातमीजबलपूर पाटलीपुत्र स्थानकप्राण वाचवलेभारतीय रेल्वेमुक्तपीठमुंबई लोकमान्य टिळक-पाटलीपुत्र सुपरफास्ट ट्रेन १२१४१रेल्वे प्रवासी
Previous Post

#मुक्तपीठ #Live #मुंबई #शिवसेना शिवसंपर्क सभा: उद्धव ठाकरेंचं अनेकांचे मास्क काढून चेहरे उघडे पाडणारं झणझणीत, खणखणीत भाषण

Next Post

आता कॅब कंपन्यांनी सुधारणा केली नाही तर, सरकार कडक कारवाई करणार

Next Post
cab companies

आता कॅब कंपन्यांनी सुधारणा केली नाही तर, सरकार कडक कारवाई करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!