मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलातील पहिली स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रवाहू ‘कॉर्वेट’ नौका “खुकरी” (पी ४९) दादरा- नगर हवेली आणि दमण आणि दीव प्रशासनाकडे २६ जानेवारी २२ रोजी सुपूर्द करण्यात आली. आता या युद्धनौकेवर स्थानिक प्रशासन संग्रहालय उभारणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाचा लढाऊ इतिहास अनुभवणे पर्यटकांसाठी शक्य होईल.
भव्य सोहळ्यात दीव येथील नौदलाचे ध्वजाधिकारी रिअर अॅडमिरल अजय विनय भावे यांच्या सिद्धांत आणि संकल्पनेतून हा सोहळा झाला. त्यांनी दादरा- नगर हवेली आणि दमण आणि दीव प्रशासनाचे (डीएनएचडीडी) आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झालेली नौका औपचारिकरित्या सुपूर्द केली . यावेळी भारतीय नौदलाच्या बँडने केलेल्या प्रदर्शनामुळे सर्वजण मंत्रमुग्ध झाले. अँकरेज येथे नौदलाच्या नौकांवर केलेल्या रोषणाईमुळे उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे पारणे फिटले.
ही नौका सुपूर्द करण्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांना या नौकेने सेवेत असताना केलेल्या लढाऊ कार्याची आणि क्षमतांची माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना अॅडमिरल भावे यांनी ‘आयएनएस खुकरी’ च्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या उपक्रमाबद्दल प्रशासकांचे कौतुक केले. त्यांनी कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला आणि पहिल्या ‘आयएनएस खुकरी’वरील च्या शूर अधिकारी आणि सैनिकांच्या बलिदानाचीही प्रशंसा केली. त्यांच्या स्मरणार्थ ‘दिव’चे भव्य स्मारक समर्पित करण्यात आले आहे.
दिव प्रशासनाने पर्यटकांच्या भेटीसाठी ‘खुकरी’ चे संग्रहालयात रूपांतर करण्याचे नियोजन केले आहे. हे संग्रहालय सध्याच्या “खुकरी मेमोरिअल”सह असेल. तेथे ब्लॅकवुड क्लास अँटी-सबमरीन फ्रिगेट, पहिल्या आयएनएस खुकरी (एफ १४९)ची स्केल-डाउन आवृत्तीदेखील ठेवण्यात आली आहे.